Video : बंदुकीच्या धाकाने कारमधील कुटुंबाला लुटलं ; घटना ‘CCTV’त ‘कैद’

दिल्ली : वृत्तसंस्था – कारमधून घरी परतणाऱ्या कुटुंबाला पाठलाग करून तिघांनी बंदुकीच्या धाकाने लुटल्याची घटना समोर आली आहे. ही घटना रविवारी पहाटे तीनच्या सुमारास राजधानी दिल्ली येथे घडली आहे. हा थरार पार्किंगमध्ये असलेल्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे. कार चालक आपल्या दोन लहान मुलं आणि पत्निसमवेत घरी आले असता आरोपींनी पार्किंगमध्ये बंदूकीचा धाक दाखवून लुटले.

दिल्लीतील मॉडेल टाऊन परिसरात राहणारे वरुण बहल यांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. वरुण हे आपल्या पत्नी आणि मुलांसह रविवारी पहाटेच्या सुमारास सासुरवाडीहून घरी परत येत होते. घराबाहेर तीन बुरखाधाऱ्यांना पाहिल्यानंतर त्यांनी आपली मर्सिडीज कार पुढे नेली. घराचे मुख्य गेट उघडे असल्याने त्यांनी गाडी पुन्हा घराच्या दिशेने वळवली. कार पार्क करून गेट बंद करण्यासाठी वरूण गेले असता बुरखाधाऱ्यांनी त्यांना बंदुकीचा धाक दाखवत त्यांना पार्किंगमध्ये आणले. हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

लुटारुंनी वरुण यांचे पैशाचे पाकीट, सोन्याचे ब्रासलेटची मागणी केली तर एकाने गाडीमध्ये बसलेल्या वरुण यांच्या पत्नीच्या गळ्यातीले, कानातले मागितले. मात्र, त्यांच्यकडे काहीच नव्हते. त्यांनी सर्व वस्तू एका पर्समध्ये ठेवून ती पर्स शिटच्या खाली ठेवल्यामुळे चोरट्यांना काहीच मिळाले नाही. अखेर चोरट्यांनी मोबाईल घेऊन पसार झाले. वरुण यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.