तिहार जेलमध्ये असलेल्या चिदंबरम यांना आणखी एक झटका, कोर्टानं ED ला अटक करण्याची दिली परवानगी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयएनएक्स मीडिया घोटाळा प्रकरणात अडकलेले देशाचे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना अटक करण्यास सक्तवसुली संचलनालयाला (ED) मंगळवारी (दि.15) विशेष न्यायालयाने परवानगी दिली. न्यायालयाच्या निर्देशानुसार ईडीचे पथक बुधवारी (दि.16) चिदंबरम यांची तिहार तुरुंगात चौकशी करणार आहे. आपल्याला अपमानित करण्यासाठी तुरुंगात ठेवण्याचा सीबीआयचा डाव आहे. त्यामुळे जामीन दिला जावा, अशी विनंती चिदंबरम यांच्याकडून आज सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली. यावर सुनावणी पुढे ढकलण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला.

ईडीचे पथक बुधवारी तिहार तुरुंगात जाऊन चिदंबरम यांची चौकशी करणार असून त्यानंतर त्यांना अटक करण्यात येऊ शकते असे ईडीच्या सुत्रांकडून सांगण्यात आले. ईडीकडून तुरुंग प्रशासनाला चिदंबरम यांना अटक करण्याचे कारण सांगणार असून अटकेनंतर त्यांना 24 तासात न्यायालयात हजर करुन त्यांच्या कस्टडी मागण्यात येणार आहे. बुधवारी सकाळी आठ वाजता ईडीचे एक पथक चिदंबरम यांची चौकशी करण्यासाठी तिहार जेलमध्ये जाणार आहे.

चिदंबरम यांची चौकशी करण्यासाठी विशेष न्यायालयाने ईडीला दोन पर्याय दिले होते. त्यातील एक पर्य़ाय ईडीने निवडला असल्याचे ईडी सुत्रांकडून सांगण्यात आले. त्यानुसार तिहार तुरुंगात ईडीचे पथक अर्धातास चिदंबरम यांची चौकशी करणार आहे. दरम्यान, चिदंबरम यांची बाजू मांडताना अ‍ॅड. कपिल सिब्बल आणि अ‍ॅड. अभिषेक मनू सिंघवी यांनी सीबीआयवर गंभीर आरोप केले.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा…आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध,अशी घ्या काळजी