रॉबर्ट वाड्रांना परेदशात जाण्यास न्यायालयाची परवानगी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीच्या राउज एवेन्यू कोर्टाने रॉबर्ट वाड्रा यांना परदेशात जाण्याची परवानगी दिली आहे. कोर्टाने त्यांना 21 सप्टेंबर पासून 8 ऑक्टोबर पर्यंत परदेशात जाण्याची परवानगी दिली आहे. या आधीही एकदा रॉबर्ट वाड्रा यांना परदेशात जाण्याची परवानगी दिली होती.

मनी लॉन्ड्रींगच्या आरोपाखाली असलेले वाड्रा हे सध्या जामीनावर बाहेर आहेत. अंमलबजावणी संचालनालयाने वाड्रा यांच्या विदेश परवानगीला कोर्टात विरोध दर्शविला होता. कोर्टाने वाड्रा यांना परदेशात जाण्यासाठी परवानगी देण्याची ही दुसरी वेळ आहे.

या आधीही एकदा वाड्रा यांनी ट्युमरच्या उपचारासाठी विदेशात जाण्याची परवानगी घेतली होती आणि आता कोर्टाने पुन्हा एकदा त्यांना विदेशात जाण्याची परवानगी दिली आहे.

नेमका काय आहे रॉबर्ट वाड्रा यांच्यावर आरोप –
शस्त्रास्त्रांची विक्री करणाऱ्या दलालांकडून लंडनमध्ये बेहिशेबी मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप वाड्रा यांच्यावर आहे. रॉबर्ट वाड्रा आणि त्यांचे सहाय्यक मनोज अरोरा यांच्याकडून पाठवण्यात आलेल्या मेलमध्ये आर्थिक देवाण घेवाणीचा उल्लेख करण्यात आलेला आहे. हा व्यवहार २००९ मधील आहे.

आरोग्यविषयक वृत्त –