मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी रॉबर्ट वाड्रांना दिलासा 

नवी दिल्‍ली : वृत्तसंस्था – मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी रॉबर्ट वाड्रा यांना दिलासा मिळाला आहे. गेल्या वर्षी वाड्रा यांच्या कार्यालयात अंमलबजावणी संचालनालयानाकडून (ईडी) छापेमारी करण्यात आली होती. रॉबर्ट वाड्रा यांच्‍या कार्यालयातून मागच्‍या वर्षी जप्‍त करण्‍यात आलेले दस्‍तावेज आणि त्याच्या प्रती वाड्रा यांना परत कराव्यात, असे निर्देश दिल्‍लीच्‍या पटियाला हाऊस कोर्टाने अंमलबजावणी संचालनालयास (ईडी) दिले आहेत. दस्‍तावेज प्रती मिळेपर्यंत ईडीकडून होणारी चौकशी थांबवावी, अशी मागणी वाड्रा यांनी केली आहे. त्यावर आज दुपारी दोन वाजता सुनावणी होणार आहे.

रॉबर्ट वाड्रा यांच्यामागे ईडीच्या चौकशीचा ससेमिरा लागला आहे. वाड्रा यांच्यावर परदेशात गैरमार्गाने संपत्ती कमावल्याचा आरोप आहे. याप्रकरणी डिसेंबर महिन्यात त्यांच्या कार्यालयात छापेमारी करण्यात आली होती. तब्बल १६ तास वाड्रा यांच्या कार्यलायत ईडीने ही छापेमारी केली होती. त्‍यावेळी त्‍यांच्‍या कार्यालयातून काही दस्‍तावेजच्‍या प्रती जप्‍त करण्‍यात आल्‍या होत्‍या. या प्रकरणी जप्‍त केलेले दस्‍तावेज त्‍यांना परत करावेत असे निर्देश विशेष न्‍यायाधीस अरविंद कुमार यांनी ईडीला दिले आहेत. तसेच दिल्‍ली कोर्टाने पाच दिवसांच्‍या आत दस्‍तावेजच्‍या प्रती वाड्रा यांना उपलब्‍ध करुन देण्‍याचेही निर्देश दिले आहेत.

काय आहे प्रकरण ?
रॉबर्ट वाड्रांकडून लंडनमध्ये खरेदी करण्यात आलेली संपत्ती मनी लॉण्ड्रिंगमधील पैशातून खरेदी करण्यात आल्याचा आरोप ईडीने केला आहे. वाड्रा हे लंडनमधील एका फ्लॅटचे व्हर्चुअल मालक असल्याचा दावा ईडीने न्यायालयात केला आहे. व्हर्चुअल मालक हा एखाद्या संपत्तीचा अप्रत्यक्ष मालक असतो. कागदोपत्री हा मालक जरी नसला तरी त्याचा हक्क असल्याचे भासवतो. हा फ्लॅट फरार संजय भंडारी याने १६ कोटी ८० लाख रुपयांना खरेदी केला होता. तसेच वाड्रा यांचे नियंत्रण असलेल्या फर्मने हा फ्लॅट त्याच किमतीत भंडारी याच्याकडून खरेदी केला होता. भंडारीविरोधात ऑफिशियर सिक्रेट ॲक्ट अंतर्गत २०१६ साली गुन्हा दाखल झाला होता.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like