पी. चिदंबरम यांचा 11 डिसेंबरपर्यंत ‘तिहार’ जेलमध्येच ‘मुक्काम’, न्यायालयीन कोठडीत ‘वाढ’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीतील विशेष न्यायालयाने आयएनएक्स मनी लॉन्ड्रींग प्रकरणी आरोपी असलेले माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम यांची न्यायालयीन कोठडी 11 डिसेंबरपर्यंत वाढवली आहे. विशेष न्यायालयाच्या अजय कुमार कुहाड़ यांनी कोठडीत वाढ करण्याचे आदेश दिले. या आधी ईडीने तपास सुरु असल्याचे सांगत आणखी 14 दिवसांसाठी कोठडीत वाढ करण्याची मागणी केली होती. चिदंबरम यांच्या वकिलाने ईडीच्या या याचिकेला विरोध केला नाही. चिदंबरम यांची कोठडीची मुदत संपल्यामुळे त्यांना विशेष न्यायालयात हजर केले होते.

काय आहे प्रकरण
15 मे 2017 रोजी ईडीने चिदंबरम यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. यानुसार आयएनएक्स मीडिया प्रायव्हेट लिमिटेडने 4.62 कोटी रुपयांच्या बदल्यात 403.07 कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक मिळवली. तपासादरम्यान असे आढळले की आयएनएक्स मीडिया प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक इंद्राणी मुखर्जी आणि पीटर मुखर्जी, माजी अर्थमंत्री पी चिदंबरम आणि त्यांचे सुपुत्र कार्ती चिदंबरम यांच्यासह अनेक अधिकारी गुंतले होते.

UPA सरकारमध्ये केंद्रीय गहृमंत्री राहिलेल्या चिदंबरम यांना 21 ऑगस्ट रोजी त्यांच्या निवासस्थानावरून सीबीआय ने अटक केली होती. ज्यावेळी हा सर्व आयएनएक्सचा घोटाळा झाला त्यावेळी चदंबरम हे अर्थ मंत्री होते. बुधवारीच काँग्रेसचे राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी तिहारजेलमध्ये चिदंबरम यांची भेट घेतली होती.

Visit : Policenama.com