निर्भया केस : चारही दोषींना पुढील आदेश होईपर्यंत फाशी नाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निर्भया रेप अँड मर्डर केसमधील चारही आरोपींची फाशी पुन्हा एकदा लांबणीवर गेली आहे. जो पर्यंत पुढील आदेश येत नाही तोपर्यंत आता त्यांना फाशी देता येणार नाही. दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टानं स्पष्ट केलं आहे की, पुढील आदेशापर्यंत या चौघांना फाशी देण्यात येऊ नये. सर्व कार्यवाही आणि प्रक्रिया ठिक असली असती तर उद्या (1 फेब्रुवारी 2020) सकाळी 6 वाजता चारही दोषींना फाशी दिली जाणार होती. परंतु आता ही फाशी टळली आहे.

फाशी लांबणीवर जाण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधीही 22 जानेवारी 2020 रोजी सकाळी 7 वाजता दोषींना फाशी दिली जाणार होती. परंतु ही तारीखही पुढे ढकलण्यात आली होती. यानंतरच उद्याची फाशी दिली जाणार होती. मात्र आता त्यांची दुसरी फाशीही तात्पुरती टळली असून लांबणीवर गेली आहे. पटियाला हाऊस कोर्टानं निर्भया केसमधील दोषींसाठी काढण्यात आलेल्या डेथ वॉरंटवर पुढील आदेशापर्यंत स्थिगिती दिली आहे.

पवनची फेरविचार याचिका फेटाळली
आज सुप्रीम कोर्टानं निर्भया केसमधील चार दोषींपैकी एक असणाऱ्या पवन गुप्ताची फेरविचार याचिका फेटाळून लावली आहे. पवन गुप्तानं असा दावा केला की, जेव्हा ही घटना घडली तेव्हा तो अल्पवयीन होता. सुप्रीत कोर्टानं हा दावा अमान्य केला आहे.