Delhi : सांगा कसे उपचार करणार डॉक्टर्स? स्वतःच्याच हॉस्पीटलमध्ये डॉक्टरला नाही मिळाला बेड, व्हिडीओ बनवून केली ‘ही’ विनंती (Video)

नवी दिल्ली : संपूर्ण देशात कोरोनामुळे हाहाकार उडाला आहे. दररोजची नवीन प्रकरणे आणि मृतांच्या आकड्यांचा विक्रम होत आहे. वाढत्या प्रकरणांमुळे आरोग्य व्यवस्थेवर वाईट परिणाम झाला आहे. स्थिती इतकी बिघडली आहे की, हॉस्पिटलमध्ये बेड आणि ऑक्सीजन न मिळाल्याने काही रूग्णांचा जीव गेल्याच्या घटना घडल्या आहेत. अनेक ठिकाणी ऑक्सीजन आणि रेमडेसिविर औषधाची टंचाई निर्माण झाली आहे. स्थितीचा अंदाज यावरून येऊ शकतो की, राजधानी दिल्लीत एका डॉक्टरला सुद्धा त्या हॉस्पिटलमध्ये बेड मिळाला नाही, जिथे तो काम करत होता.

 

 

 

 

 

मनीष यांचा व्हिडिओ झाला वायरल
दिल्लीच्या प्रसिद्ध राम मनोहर लोहिया हॉस्पिटलमध्ये काम करणारे निवासी डॉक्टर मनीष जांगडा जेव्हा कोरोना पॉझिटिव्ह झाले तेव्हा त्यांची स्थिती प्रकृती खुप खालावली. यानंतर जे घडले ते हैराण करणारे होते. डॉक्टर मनीष यांना त्याच हॉस्पिटलमध्ये बेड मिळाला नाही जिथे ते काम करतात. यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की, स्थिती कशाप्रकारे बिघडली आहे. डॉक्टर मनीष यांना जेव्हा बेड मिळाला नाही तेव्हा त्यांनी व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर विनंती केली.

व्हिडिओ समोर आल्यानंतर मिळाला बेड
डॉक्टर मनीष यांचा व्हिडिओ वायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर लोक त्यांच्या मदतीला धावून गेले आणि परिणाम हा झाला की, मनीष यांना बेड मिळाला. परंतु मनीष आपल्या व्हिडिओमध्ये ज्या व्हिआयपी कल्चरचा उल्लेख केला आहे ती बाब हैराण करणारी आहे. मनीष व्हिडिओ म्हणतात, माझे नाव मनीष जांगडा आहे. मी आरएमएल हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आहे. येथे डॉक्टर असूनही मला बेड मिळाला नाही. व्हीआयपी लोकांनी बेड आडवून ठेवले आहेत. येथे व्हीआयपी लोकांनाच प्रॉयरिटी दिली जाते. येथे डॉक्टरांना कुणीही विचारत नाही. डॉक्टरांसाठी काही करा.