Delhi Crime | ‘हो, मी रागाच्या भरात श्रद्धाचा खून केला’; आफताबने न्यायालयात दिली कबुली

दिल्ली: वृत्तसंस्था – वसईच्या श्रद्धा वालकर (Shraddha Walkar) खून प्रकरणी आफताबला आज (दि. 22) न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी त्याने श्रद्धाचा खून (Delhi Crime) केल्याची कबुली न्यायालयाला दिली आहे. आफताबला (Aaftab Poonawala) दिल्लीतील साकेत न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी त्याने न्यायाधीशांसमोर आपणच श्रद्धाची हत्या केल्याचे मान्य केले. न्यायालयाने आफताबच्या (Delhi Crime) कोठडीत चार दिवसांची वाढ केली आहे.

 

मी रागाच्या भरात कोणताही विचार न करता श्रद्धाचा खून केला, असा दावा आफताबने न्यायाधीशांसमोर केला. हत्येला सहा महिने झाले असून, मला काही गोष्टी आठवत नसल्याने मी पोलिसांना सांगू शकत नसल्याचे आफताबने (Delhi Crime) म्हंटले आहे. तसेच मी पोलिसांना तपासात सहकार्य करत असून, यापुढेही करेन असे आफताबने न्यायालयात कबूल केले आहे.

 

पोलिसांना सोमवारी महारोलीच्या जंगलात एक जबडा आणि आणि काही हाडे मिळाली आहेत.
हा जबडा आणि हाडे डॉक्टरांकडे पाठविली असून, डॉक्टर ही श्रद्धाची आहेत का, याची तपासणी करत आहेत.
आफताबची नार्को चाचणी (Narco Test) होणार आहे.
त्यामुळे ती करण्याअगोदर पॉलिग्राफ चाचणी होणे आवश्यक आहे.
न्यायालयाने परवानगी दिली नसल्याने सोमवारी आफताबची नार्को चाचणी होऊ शकली नाही.
न्यायालयाने पॉलिग्राफ चाचणी करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे तिच्या नंतर आफताबची नार्को चाचणी करण्यात येणार आहे.

 

Web Title :- Delhi Crime | aftab poonawala accepts murdering shraddha walkar in court says whatever happened happened in the heat of the moment

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

UGC 4 Year Graduation Program | युजीसीचा मोठा निर्णय ! आता 12 वी नंतर डिग्रीसाठी 4 वर्ष लागणार

Social Media Influencer Rohit Bhati | सोशल मीडिया स्टार रोहित भाटीचा भीषण अपघातात मृत्यू

Vinayak Raut | शिंदे सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा करतंय; उद्धव ठाकरे शेतकरी संवाद मेळावा घेणार – विनायक राऊत