दिल्लीचे उपमुख्यमंत्र्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात केले दाखल

पोलिसनामा ऑनलाईन टीम – श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मागील आठवड्यात त्यांना कोरोनाची लागण झाली होती. सध्या त्यांना लोकनायक जयप्रकाश रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कोरोनानंतर मनिष सिसोदिया होम क्वारंटाइन होते. परंतु त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यांची ऑक्सिजनची पातळी देखील कमी होती. यापूर्वी दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांना देखील कोरोनाची लागण झाली होती.

त्यांची तब्येत बिघडल्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात भरती केले होते. सत्येंद्र जैन यांनी कोरोनावर मात केली आहे. मनिष सिसोदिया यांची प्रकृती स्थिर आहे. काही दिवसांपासून दिल्लीतील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राजधानीमध्ये दिवसाला 4 हजारपेक्षा अधिक रुग्ण दिवसाला सापडत आहे. ऑक्सिजनच्या पुरवठ्याबद्दल दिल्ली सरकारने प्रश्न उपस्थित केला होता.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like