दिल्ली विधानसभा निवडणूकीत भाजपच्या ‘या’ 5 दिग्गजांची ‘वादग्रस्त’ वक्तव्ये पडली महागात, झाला लाजिरवाणा ‘पराभव’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली विधानसभा निवडणूकीत आपकडून भाजपचा मोठा पराभव करण्यात आला. दिल्लीतील जनतेने पुन्हा केजरीवाल यांच्यावर विश्वास दर्शवला. भाजप पेक्षा आपचे आकडे खूपच पुढे होते. भाजपला तर 10 चा आकडा देखील गाठता आला नाही. त्यामुळे असे म्हणण्यास हरकत नाही की भाजपच्या आक्रमक प्रचाराचा भाजपला तोटा झाला.

प्रकाश जावडेकर – केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी एका निवडणूक प्रचार कार्यक्रमात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दहशतवादी ठरवले होते. ते म्हणाले की केजरीवाल दहशतवादी आहे आणि त्याची अनेक उदाहरणे आहेत.

योगी आदित्यनाथ – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी निवडणूकीदरम्यान शाहीन बागसंबंधित वादग्रस्त वक्तव्य केले होते. ते म्हणाले होती की काश्मीरमध्ये बिर्याणी खायला घालण्याचे काम काँग्रेस करत होती आणि दिल्लीत आम आदमी पार्टी तेच काम करत आहे.

परवेश वर्मा – भाजप खासदार परवेश शर्मा यांनी निवडणूक प्रचारादरम्यान एका कार्यक्रमात म्हणले होती की शाहीन बागमधील लोक तुमच्या घरात घुसतील आणि तुमच्या मुली बहिणीवर बलात्कार करतील आणि तुम्हाल देखील मारतील. आजच वेळ आहे, त्यानंतर पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह तुम्हाला वाचवायला येणार नाहीत.

अनुराग ठाकूर – प्रचारावेळी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले होती की भाजप सत्तेत आल्यावर शाहीन बागमधून आंदोलनकर्त्यांना हटवला जाईल. त्यांनी गोळीबाराचे नारे देखील लावले.

मनोज तिवारी – मनोज तिवारी दिल्ली भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी दावा केला की, दिल्लीत भाजपला 48 जागांवर विजय मिळेल. असे असले तरी त्यांचा दावा फेल ठरला आहे.