देशातही केजरीवालांचं ‘दिल्ली मॉडेल’ आणणार : AAP खा. संजय सिंह

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  दिल्ली निवडणुकीतील बंपर विजयानंतर आम आदमी पार्टीचा उत्साह वाढला आहे. पार्टीचे खासदार आणि दिल्लीचे प्रभारी संजय सिंह यांचे म्हणणे आहे की, आम्ही अरविंद केजरीवाल यांचे दिल्ली विकासाचे मॉडेल देशभरात लागू करू आणि ज्या-ज्या ठिकाणी पार्टी पुढे जाऊ शकते, जसे वाटेल तेथे आम्ही पुढे जाऊ.

ते म्हणाले की, आम्ही लागोपाठ निवडणूक जिंकत आहोत. अशावेळी संघटनेच्या विस्ताराची संधी असते. याच मार्गावर आम्ही प्रयत्न करत आहोत. यासाठी आम्ही मिस्ड कॉल नंबर जारी केला होता. जेथे आमची संघटनात्मक स्थिती मजबूत असेल तेथे पार्टीचा विस्तार होईल.

संजय सिंह म्हणाले, आमचे नेतृत्व ठरवेल की, आम्हाला निवडणुका कुठे लढायच्या आहेत आणि कुठे लढायच्या नाहीत. आता तर आम्ही दिल्लीची निवडणूक जिंकलो आहोत. पुढे हळूहळू पार्टीचा विस्तार करू. यानुसार पार्टी निर्णय घेईल.

दिल्लीचे मॉडेल देशभरात घेऊन जाण्याबाबत संजय सिंह म्हणाले, मला वाटते की, दिल्ली मॉडेल योग्य आहे. आज मला आनंद याचा वाटतो की, महाराष्ट्रातील सरकार म्हणत आहे की, 100 यूनिट वीज मोफत करू. झारखंडचे सरकारही म्हणत आहे की, आम्ही दिल्लीचे एज्युकेशन मॉडेल वापरू. तेलंगानाचे मुख्यमंत्री म्हणत आहे की, आम्ही मोहल्ला क्लिनिक मॉडेल स्वीकारू. ही देशातील राजकारणासाठी मोठी गोष्ट आहे.

देशात केजरीवाल यांच्या चेहर्‍यावर निवडणुका जिंकण्याबाबत संजय सिंह म्हणाले की, केव्हा निवडणुका लढायच्या आहेत, हे पार्टी ठरवेल. दिल्ली निवडणुकीद्वारे आम्ही अभद्र भाषा आणि द्वेषाच्या राजकारणाला उत्तर दिले आहे.