दिल्ली विधानसभा : 70 जागांवर 1042 उमेदवार, नवी दिल्लीच्या सीटसाठी 52 उमेदवारांचे अर्ज ‘फेटाळले’

नवीदिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीतील विधानसभा निवडणुकीसाठी सर्व उमेदवारांनी दोन दिवस आधी अर्ज दाखल केले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आज शेवटची तारीख होती. दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी 1528 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 1042 उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यात आले असून 473 अर्ज रद्द करण्यात आले आहेत. 13 उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे.

मिळालेल्या माहितींनुसार दिल्लीमध्ये नवी दिल्लीच्या जागेवर सर्वाधिक उमेदवारांनी म्हणजेच 80 जणांनी उमेदवारी अर्ज भरला होता. विशेष म्हणजे याच मतदार संघातून अरविंद केजरीवाल निवडणूक लढवत आहेत. याठिकणी देखील 52 अर्ज फेटाळण्यात आले तर 28 अर्ज पात्र ठरवले गेले. याठिकाणी अर्ज भरण्यासाठी स्वतः केजरीवाल यांना देखील 6 तास वाट पहावी लागली होती. 24 जानेवारी हा अर्ज मागे घेण्यासाठीच शेवटचा दिवस होता.

दिल्ली निवडणूक आयोगाने आपल्या अधिकृत वेबसाईटवर एक लिस्ट सबमिट केली आहे. ज्यामध्ये उमेदवारांची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. जी तुम्ही https://affidavit.eci.gov.in/ या ठिकणी पाहू शकता.

फेसबुक पेज लाईक करा –