AAP चं सरकार निर्भयाच्या गुन्हेगारांना वाचविण्याच्या प्रयत्नात : मनोज तिवारी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणात भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी केजरीवाल सरकारवर निशाणा साधला. मनोज तिवारी म्हणाले, ‘दोन वर्ष दोषींना शिक्षेबद्दल सांगायचे होते, मग दिल्ली सरकारने का सांगितले नाही. ही बाब जेल विभागाची असून जेल विभाग दिल्ली सरकारकडे आहे. आम आदमी पक्षाचे सरकार असे करते, त्यात दिल्लीचे उपमुख्यमंत्री म्हणतात की, आमच्याकडे दिल्ली पोलिस असते तर आम्ही शिक्षा केली असती. ते पुढे म्हणाले कि, ‘आता हे स्पष्ट झाले आहे की, जे काम केजरीवाल सरकारचे होते, ते त्यांनी केले नाही. केजरीवाल सरकारने मुद्दाम दोषींना वाचविण्याचा प्रयत्न केला. हा प्रश्न राजकारणाचा नाही तर बलात्कार करणार्‍यांनाही वाचवण्याचा प्रयत्न केला आहे.

दुसरीकडे निर्भयाच्या आईने निर्भया दोषींना फाशी देण्यास वारंवार उशीर केल्याबद्दल आम आदमी आणि भारतीय जनता पक्षावर तीव्र नाराजी व्यक्त केली. आप आणि भाजपाचे नाव न घेता निर्भयाच्या आईने सांगितले की, २०१२ मध्ये जेव्हा मुलीवर बलात्कार झाला होता, त्यावेळी या दोन्ही पक्षातील लोकांनी त्यांच्या डोक्यावर काळी पट्टी बांधत आणि हातात तिरंगा घेऊन निदर्शने केली होती.

आप – भाजपमध्ये फक्त वक्त्यवच सुरु :
दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि आपचे नेते मनीष सिसोदिया म्हणाले होते की, दिल्ली पोलिस आप सरकारला दोन दिवस द्यावे, आम्ही निर्भयाच्या दोषींना फाशी देऊ. यापूर्वी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते प्रकाश जावडेकर म्हणाले होते की निर्भया दोषींना फाशी देण्यास उशीर करण्यामागे आप सरकारचे दुर्लक्ष आहे. फाशी देण्यास होणाऱ्या दिरंगाईबाबत दोन्ही पक्षांकडून अशीच विधाने केली जात आहेत.

आता 1 फेब्रुवारीला देण्यात येणार फाशी :
दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील चार दोषींसाठी नवीन डेथ वॉरंट कोर्ट जारी केले आहे. या चार दोषींना आता 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 वाजता फाशी देण्यात येईल. पहिल्या चार दोषी विनय, मुकेश, पवन आणि अक्षय यांना 22 जानेवारी रोजी फाशी देण्यात येणार होती.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/