दिल्ली विधानसभा : निवडणूक आयोगानं भाजपच्या ‘या’ 2 दिग्गजांची केली ‘बोलती’ बंद

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भाजपचे खासदार प्रवेश वर्मा आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्यावर वादग्रस्त विधान केल्याने निवडणूक आयोगाने कारवाई केली आहे. निवडणूक आयोगाने आता यांची नावे स्टार प्रचारकांच्या यादीतून काढण्याचे आदेश जारी केले आहेत. दोन्ही नेता अद्यापही दिल्लीमध्ये निवडणूकीत प्रचार करत आहेत.

असे असले तरी निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर देखील प्रवेश वर्मा आणि अनुराग ठाकूर निवडणूकीत प्रचार करु शकतात परंतु जर उमेदवार या दोघांना घेऊन रॅली सहभागी करतील तर त्याचा खर्च उमेदवाराच्या निवडणूक खर्चात जोडला जाईल. यापूर्वी या नेत्यांच्या रॅलीचा खर्च पक्षाच्या खर्चात जोडला जात होता.

प्रवेश वर्मा यांना निवडणूक आयोगाने पाठवली नोटीस –
स्टार प्रचारकांना यादीतून हटवण्यात आल्यानंतर प्रवेश शर्मा यांना निवडणूक आयोगाकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. ही नोटीस दोन वक्तव्यावर जारी करण्यात आली आहे. 12 तासात यावर उत्तर मागवले आहे. याशिवाय अनुराग ठाकूर यांना देखील नोटीस पाठवण्यात आली आहे.

केजरीवाल दहशतवादी –
भाजप खासदार प्रवेश वर्मा यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची तुलना दहशतवादी-नक्षलवादी अशी केली होती. मादीपूरमध्ये एका सभेदरम्यान प्रवेश वर्मा म्हणाले की, केजरीवाल यांच्यासारखे नटवरलाल… केजरीवाल यांच्यासारखे दहशतवादी देशात लपलेले आहेत. आम्हाला तर विचार करावा लागतो की कश्मीरमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांशी लढावे की केजरीवाल सारख्या दहशतवाद्याशी लढावे.

केजरीवालांनी व्यक्त केली नाराजी –
प्रवेश वर्मा यांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करत नाराजी व्यक्त केली. त्यांनी ट्विट केले की पाच वर्ष दिवसरात्र मेहनत करुन दिल्लीसाठी काम केले. दिल्लीकरांसाठी सगळा त्याग केला. राजकारणात आल्यानंतर कठीण परिस्थितींचा सामना केला, जेणे करुन लोकांचे जीवन सुखी होईल. येवढे करुन आज मला भाजपने दहशतवादी ठरवले. खूप दु:ख होत आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर रॅलीत म्हणाले होते की देशाच्या गद्दारांना गोळ्या घाला. या प्रकरणी निवडणूक आयोगाने त्यांनाही नोटीस जारी केली आहे.

फेसबुक पेज लाईक करा