दिल्ली विधानसभा : पतीसाठी सौ. केजरीवाल प्रचाराच्या मैदानात, अरविंद यांच्याशी ‘कसं’ प्रेम झालं ते सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली विधानसभा निवडणुकीची मतदानाची तारीख जवळ आली आहे. निवडणुकीच्या रिंगणात तीनही प्रमुख पक्षांच्या उमेदवारांचा प्रचार जोरात सुरू आहे. राजकीय लढाई जोरात सुरू असली तरीही तयारीमध्ये देखील कमी पडत नाही. सर्व पक्षांनी आपल्या स्टार प्रचारकांना निवडणुकीच्या रिंगणात आणले आहे. उमेदवारांसोबत कुटुंबेही खांद्याला खांदा लावून प्रचार करीत आहेत.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल राजधानीच्या सर्व भागात आम आदमी पक्षासाठी प्रचार करत आहेत. परंतु त्यांच्या पत्नी सुनीता या केजरीवालांच्या मतदारसंघात निवडणूक प्रचाराचे नेतृत्व करीत आहेत. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी आणि माजी आयआरएस अधिकारी सुनीता केजरीवाल यांनी प्रथमच निवडणूक प्रचारात प्रवेश केला आहे.

गल्ली, कोपरा आणि कॉलनीपासून ते महिला मेळाव्यापर्यंत सुनीता केजरीवाल मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासाठी मते मागत आहेत. एका वृत्तसंस्थेच्या टीमने त्यांचा निवडणूक प्रचारविषयी बातमी दिली आहे. सुनीता केजरीवाल यांनी सकाळची सुरुवात महिला मोहल्ला सभेने केली. आम आदमी पक्षाचे गॅरंटी कार्ड काय आहे आणि अरविंद केजरीवाल यांना मतदान का करावे, असे त्या नवी दिल्ली महिला मतदारांना सांगत आहे.

प्रथमच निवडणूक प्रचारासाठी उतरल्या
एका वृत्तसंस्थेशी बोलतांना सुनीता केजरीवाल म्हणाल्या, ‘प्रचारासाठी बाहेर पडण्याची ही पहिलीच वेळ आहे. घराची जबाबदारी इतकी मोठी होती की त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला.

केजरीवाल यांच्याशी अशी झाली भेट
संभाषणादरम्यान सुनीता केजरीवाल यांनी आपल्या पतीबरोबर नात्याची सुरूवात कशी झाली आणि काही वैयक्तिक गोष्टीही सार्वजनिकरित्या सांगितल्या. त्यांनी सांगितले की आयआयटीमध्ये असताना त्यांची भेट झाली, दोघे बर्‍याचदा भेटले आणि मग एक दिवस अरविंद केजरीवाल यांनी त्यांना प्रपोज केले.

सक्रिय राजकारणात प्रवेश करणार नाही
निवडणूक लढविण्याच्या प्रश्नावर सुनीता केजरीवाल म्हणाल्या की त्या कधीही सक्रिय राजकारणात प्रवेश करणार नाही आणि निवडणुकही लढवणार नाहीत. राजकारणात मुलांच्या आगमनाच्या संदर्भात त्या म्हटल्या की ते त्यांच्यावर अवलंबून आहे. जर त्यांना यायचे असेल तर ते येऊ शकतात अन्यथा त्यांच्या आवडीचे करियर निवडू शकतात.

निवडणुकीच्या वेळी पती केजरीवाल यांच्यावर अनेक वेळा शारीरिक हल्लेही केले गेले. सुनीता यांनी सांगितले की अशा परिस्थितीत तणावाची परिस्थिती असते, परंतु त्या प्रत्येक परिस्थितीत पतीबरोबरच राहतात. अरविंद केजरीवाल दुपारी जेवतात. यावेळी कार्यकर्त्यांची बैठकही होते. तेथे ते पक्षाची रणनीती ठरवतात. जेवण आणि मीटिंगनंतर पुन्हा एकदा निवडणूक प्रचार सुरू होतो.

फेसबुक पेज लाईक करा –