दिल्लीत मतदानाच्या दिवशी देखील नाही थांबली ‘वक्तव्ये’ ; ‘शाहीन बाग’, ‘भगवा’ आणि ‘हनुमान’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीत 70 जागांसाठी आज मतदान होत आहेत. परंतु यादरम्यान नेत्यांकडून केली जाणारी वक्तव्य काही थांबली नाहीत. दिल्लीत भाजपकडून प्रचारादरम्यान शाहीन बागचा मुद्दा उपस्थित केला गेला आणि आज देखील हाच मुद्दा दिवसभर पुढे केला जात आहे. बजरंगबली हनुमानसंदर्भात भाजप आणि आपमध्ये आज देखील शाब्दिक वाद रंगले. तसेच भाजपचे अनेक नेते भगव्या रंगाच्या कपड्यात दिसले.

भाजप नेत्यांच्या ओठांवर ‘शाहीन बाग’ –
पश्चिम दिल्ली मतदारसंघातील भाजप खासदार परवेश वर्मा आपल्या पत्नीसह मतदानासाठी आले होते. मतदानानंतर परवेश वर्मा म्हणाले की दिल्लीतील लोकांनी हे निश्चित करायचे आहे की ते शाहीन बागसोबत आहेत की नाही.

तर भाजप उमेदवार कपिल मिश्रा म्हणाले की दिल्लीची जनता मतदानाच्या माध्यमातून हिशेब चूकता करेल. दिल्लीत जसं जसे बटण दाबले जाईल तसं तसे शाहीन बागमधून तंबू हटवण्यात येतील. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी म्हणाले की दिल्लीत भाजपला तितक्याच जागा मिळतील जितके दिवस शाहीन बाग आंदोलन सुरु आहे.

कागद न दाखवणाऱ्यांची मानसिकता हरेल –
आरएसएसचे संपर्क प्रमुख रामलाल यांनी मतदानानंतर सांगितले की मतदानाच्या दिवशी शाहीन बागच नाही तर अनेक मुद्यांवर मतदान होत आहे. शाहीन बागेतील आंदोलकांवर टीका करताना ते म्हणाले की जे लोक कागद न दाखवण्याचे सांगत आहेत आज मतदानावेळी त्यांना कागद तर दाखवावाच लागेल. आज मतदानावेळी कागद न दाखवणारी मानसिकता हरेल आणि कागद दाखवणारी मानसिकता जिंकेल.

भगवाधारी येत आहेत –
कपिल मिश्रा म्हणाले की दिल्लीकरांनो, आज हे सांगण्याची वेळ आहे की ते एक होऊन मतदान करु शकतात तर आम्ही देखील एक होऊन मतदान करु शकतो. घराघरात भगवा असेल. रामराज्य येईल. राजतिलकाची तयारी करा, भगवाधारी येत आहेत, जय श्री राम.

केजरीवाल यांनी स्वत:ला हनुमान भक्त सांगितले होते आणि हनुमान चालीसा म्हणून दाखवली होती. हनुमान मंदिरात जाऊन दर्शन देखील घेतले. अशात आता मतदानाच्या दिवशी देखील वक्तव्ये सुरु आहेत. केजरीवाल यांनी भाजपवर टीका केली, ते म्हणाले की जेव्हापासून मी एका टीव्ही चॅनलवर हनुमान चालीसा म्हटली, भाजपवाले माझी मस्करी करायला लागले. काल मी हनुमान मंदिरात गेलो. आज भाजप नेता म्हणाले की माझ्या जाण्याने मंदिर अशुद्ध झाले. हे कसले राजकारण?

ते म्हणाले की देव तर सर्वांचे आहेत. देवाने सर्वांना आशीर्वाद द्यावेत. भाजपवाल्यांना देखील. सर्वांचं भलं होऊ दे. याआधी मनोज तिवारी म्हणाले होती की निवडणूकीत हनुमानभक्त केजरीवाल यांचे सत्य… ज्या हाताने चपला काढल्या, त्याच हाताने बाबांवर फुलांची माळ फेकली.

भाजप नेते भगव्या रंगात रंगले –
दिल्ली निवडणूकीत आज भाजप नेते भगव्या रंगात रंगले होते. परवेश वर्मा भगवी शाल परिधान केलेले दिसले. कपिल मिश्रा भगवा सदरा घालून मतदानासाठी आले होते. मनोज तिवारी गळ्यात भगव्या रंगाचा पट्टा घातलेले दिसले. मीनाक्षी लेखी यांनी देखील भगवा पट्टा घातला होता.