दिल्लीच्या विजयानंतर आता राष्ट्र निर्माणाच्या मार्गावर AAP, CM केजरीवालांनी सुरू केलं ‘कॅम्पेन’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. सुरूवातीचे कल हाती आल्यानंतर आम आदमी पार्टी 57 जागांवर पुढे आहे, तर 13 जागांवर भारतीय जनता पार्टी पुढे आहे. दिल्लीत तिसर्‍यांदा केजरीवाल सरकार स्थापन होणार, असे दिसत आहे. आज आम आदमी पार्टीच्या कार्यालयात विजयी जल्लोषाचे वातावरण आहे. मतमोजणी सुरू असतानाच आपने आणखी एक नवे कँपेन सुरू केले आहे. हे कँपेन आहे, राष्ट्र निर्मिती.

आम आदमी पार्टीच्या कार्यालयात मंगळवारी नवे पोस्टर लागले आहे. या पोस्टरवर लिहिले आहे – राष्ट्र निर्मितीसाठी आपमध्ये सहभागी व्हा, सहभागी होण्यासाठी मिस कॉल करा 9871010101. भाजपाच्या पावलावर पाऊल ठेवून आप सुद्धा राष्ट्र निर्मितीचा मुद्दा मोठा करणार आहे आणि यासाठी सरकार आल्यानंतर मोठ्या माहिमेची सुरूवात करणार आहे, असे यावरून दिसत आहे.

देशभक्तीचा धडा शिकवणार आप
याची झलक आम आदमी पार्टीच्या जाहिरनाम्यात सुद्धा दिसली होती. आपचा जाहिरनामा जारी करताना उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी घोषणा केली होती की, जर सरकार स्थापन झाले तर सरकारी शाळांमध्ये सुरू केलेला हॅपिनेस अभ्यासक्रम आणि इंटरप्रेन्युरशिप अभ्यासक्रमाच्या यशानंतर देशभक्तीचा पाठ्यक्रमसुद्धा आणण्यात येईल.

निवडणूक प्रचारात भाजपाने सातत्याने शाहीन बागचा मुद्दा लावून धरला आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दहशतवादी जाहीर केले. यास प्रत्युत्तर देताना केजरीवाल यांनी म्हटले होते की, मी दहशतवादी आहे की नाही हे दिल्लीच्या जनतेने ठरवावे. प्रत्येक प्रचारसभेत केजरीवाल यांनी दहशतवादी म्हटल्याचा मुद्द उचलून धरला आणि आपण केलेली विकास कामे सांगून तुम्ही ठरवा तुमचा मुलगा दहशतवादी आहे का, असे आवाहन लोकांना केले होते. केजरीवाल म्हणाले, जेव्हापासून मी एका टीव्ही चॅनलवर हनुमान चालीसाचे पठन केले, तेव्हापासून भाजपावाले माझी चेष्टा करत आहेत. काल मी हनुमान मंदिरात गेलो. आज भाजपा नेते म्हणत आहेत की माझ्या जाण्याने मंदिर अपवित्र झाले आहे. हे कसले राजकारण आहे ? देव तर सर्वांचाच आहे. देवा सर्वांनाच अशीर्वाद दे, भाजपावाल्यांनाही दे.

हनुमानावर शुद्ध-अशुद्धचे राजकारण
निवडणुक प्रचारादरम्यान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एका कार्यक्रमादरम्यान हनुमान चालीसाचे पठन केले. यानंतर ते हनुमान मंदिरातही गेले. यावर मनोज तिवारी यांनी आरोप केला की केजरीवाल यांनी हनुमान मंदिर अपवित्र केले. भाजपाच्या या आरोपाला उत्तर देताना केजरीवाल यांनी म्हटले की, हे कसले राजकारण आहे ? देव तर सर्वांचाच असतो.