AAP vs BJP : सर्वात लहान सत्ताधारी पक्षाकडून हारली जगातील सर्वात मोठी पार्टी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अवघ्या सात वर्षांपूर्वी अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात बनलेल्या आम आदमी पक्षाने जगातील सर्वात मोठा पक्ष असल्याचा दावा करणाऱ्या भाजपला दिल्लीत पराभूत केले आहे. त्यामुळे दिल्लीमध्ये भाजपचा वनवास अजून ५ वर्षांनी वाढला आहे. भाजपला दोन्ही वेळा दुहेरी आकडादेखील ओलांडता आला नाही. अश्या परिस्थिती भाजपच्या रणनीतीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

अण्णा हजारे यांच्या चळवळीतून अरविंद केजरीवाल यांनी सात वर्षांपूर्वी आम आदमी पार्टीची स्थापन केली. आपचा राजकीय आधार फक्त दिल्लीपुरता थोड्या प्रमाणात पंजाबमध्ये मर्यादित आहे. दुसरीकडे भाजपचे १२ कोटींपेक्षा जास्त सदस्य असून भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षांची १६ राज्यांत सरकार आहे. अशा परिस्थितीत, दिल्लीतील सत्ता काबीज करण्यासाठी भाजपने आपल्या सर्व मोठ्या नेत्यांनी प्रचार केला होता, परंतु केजरीवाल यांचे विजय रथ रोखू शकले नाहीत. महिलांना डीटीसीमध्ये मोफत प्रवास, मोफत वीज आणि पाणी या मुद्यावर भाजप कोणताही तोडगा काढू शकली नाही. जरी भाजपने शाहीन बागला मुद्दा बनविला आणि मात्र त्याचा फायदा झाला नाही.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींसोबत जसे घडले, तोच फॅक्टर दिल्लीत अरविंद केजरीवाल यांनीही वापरला. दिल्ली मतदारांसाठी केजरीवाल यांच्याशिवाय योग्य व्यक्ती नाही, हे आपने पटवून दिले. तसेच दिल्लीत शाहीनबाग प्रकरणावर भाजप ज्या प्रकारे आक्रमक होता, त्यावरून मुस्लिम मतदारांनी आम आदमी पक्षाच्या बाजूने एकजूट केली. ज्याच्या फायदा पक्षाला डझनभर ठिकाणी झाला. त्याचवेळी केजरीवाल यांनीही हिंदुत्वाचा मार्ग स्वीकारत हनुमान चालीसा वाचली. यासह भाजपाच्या बाजूने हिंदूंच्या मतांचे ध्रुवीकरण रोखण्यातही ते यशस्वी झाले.

गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वात भाजपने रस्त्यावर पोहोचून आम आदमी पक्षाशी स्पर्धा करण्याचा प्रयत्न केला. दिल्ली निवडणुकीत पंतप्रधान मोदींनी दोन जाहीर सभा घेतल्या आणि गृहमंत्री अमित शहा यांनी सुमारे ५० मोर्चा आणि रोड शो केले. भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांनी 30 सर्वसाधारण सभा घेतल्या. त्याचवेळी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी २५ हून अधिक मोर्चांना संबोधित केले. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी १२ मोर्चाला संबोधित केले तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी १० मोर्चांना संबोधित केले. तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिल्लीत १५ सभांना संबोधित केले.

मात्र एवढा प्रचार करूनही विजय होऊ शकला नाही. २०१५ मध्ये भाजपाने ३ जागा जिंकल्या, त्यामुळे यावेळी पक्ष ८ जागांवर पोहोचू शकला. तर दुसरीकडे, आम आदमी पक्षाला ६२ जागा मिळाल्या आणि दिल्लीत त्यांना ५४ टक्के मते मिळाली. तर यावेळी कॉंग्रेसला खातेही उघडता आले नाही. महत्वाचे म्हणजे कॉँग्रेसच्या ६७ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त करण्यात आले. वास्तविक पाहता दिल्लीत दहा टक्के मते वाढविण्याची भाजपची रणनीती होती, परंतु त्यात केवळ साडेसहा टक्के मते वाढू शकली. कॉंग्रेसनेही थोडे चांगले प्रदर्शन केले असते तरी भाजपचा याचा फायदा झाला असता.