पराभवाच्या छायेतून बाहेर पडत मनीष सिसोदियांचा मोठा विजय, ‘आप’ 60 च्या ‘पार’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आपचे उमेदवार आणि उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया हे अखेर विजयी झाले आहेत, सकाळपासून त्यांच्या विजयावर पराभवाचे सावट होते. परंतु अखेर काटे की टक्कर होत दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया पुन्हा 3 हजार मतांनी आघाडी घेत विजयी झाले आहेत. मनीष सिसोदिया यांना 59,589 मतं मिळाली आहेत.

पटपटगंज विधानसभा क्षेत्रात आम आदमी पार्टीचे प्रतिष्ठीत आणि महत्वाचे नेते असलेले उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे नेते रविंदर सिंह नेगी यांचा मोठा पराभव केला आहे. भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. याच जागेवरुन काँग्रेसचे लक्ष्मण रावत मैदान उतरले होते. काँग्रेस आणि भाजपचे दोन्ही उमेदवार मूळता उत्तराखंडचे राहणारे आहेत. परंतु या दोघांना मागे पाडून मनीष सिसोदिया यांनी मोठा विजय मिळवला आहे.

दिल्लीत आपने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. आम आदमी पार्टी 62 जागांवर आघाडीवर आहे तर भाजप 8 जागांवर रोखल्या गेल्याचे दिसत आहे. भाजपचा हा आकडा आणखी कमी होताना दिसत आहे.

आप सत्ता स्थापनेच्या दिशेने वाटचाल करत असताना मॉडल टाऊनचे भाजप उमेदवार कपिल मिश्रा यांनी आपला विजयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. कपिल मिश्रा यांनी ट्विट केले की केजरीवाल आणि आपच्या शानदार विजयासाठी शुभेच्छा. भाजपच्या सर्व कार्यकर्त्याचे आभार, आपण सर्वांनी खूप मेहनत घेतली. दिल्लीकरांचे आभार, संघर्ष कायम असेल.उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी 11 व्या राऊंडमध्ये आघाडी घेतली. मनीष सिसोदिया सतत पिछाडीवर होते परंतु त्यानंतर ते 1000 मतांनी आघाडीवर गेले.

दिल्लीच्या हरिनगर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे तजिंदर बग्गा पिछाडीवर होते. तजिंदर बग्गा यांना सातव्या राऊंडपर्यंत 17,440 मत मिळली होती. तर आपचे राज कुमारी ढिल्लो यांनी 22,725 मते मिळाली.