‘देशासाठी सर्वकाही चांगली होईल’, दिल्ली विधानसभा निकालाच्या पार्श्वभुमीवर ‘गायक’ विशाल ददलानीनं सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – दिल्ली विधानसभेचा निकाल समोर येताना दिसत आहे. सुरुवातीच्या काही गोष्टींचा आढावा घेतला तर लक्षात येतं की, जनतेनं पुन्हा एकदा आम आदमी पक्षाला जनादेश दिला आहे. पुन्हा एकदा जनतेनं अरविंद केजरीवालांना मुख्यमंत्री बनवण्याचं मन बनवलं आहे. नेहमीच आम आदमी पक्षाच्या बाजूनं आपला आवाज बुलंद करणाऱ्या सिंगर विशाल ददलानीनं दिल्लीचा निकाल पाहताना मोठं विधान केलं आहे.

काय म्हणतो विशाल ददलानी ?
विशाल ददलानीनं आपचं समर्थन करत ट्विट केलं आहे. आपल्या ट्विटमध्ये विशाल म्हणतो, “हरलो तर मेहनत करू. जिंकलो तर आणखी मेहनत करू. मी निकाल नाही पाहू शकत. खूपच तणावपूर्ण वाटत आहे. निकालानंतर मी पुन्हा भेटतो. मला आशा आहे की, जे देशासाठी चांगलं आहे तेच पहायला मिळेल. मला आम आदमी पक्षाच्या बंधु आणि भगिनींना सांगू इच्छितो की, आज जर आपण जिंकलो तर तुम्ही नम्र रहा. जमीनीला जोडून रहा. जय हिंद”

विशाल आहे आप समर्थक
विशालचं हे ट्विट हैराण करत नाही. कारण हे पूर्ण जगाला माहिती आहे की, विशाल अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या राजकारणाचा मोठा समर्थक आहे. त्यांनी अनेकदा पक्षाची मदत केली आहे. जेव्हा दिल्ली विधानसभेचा प्रचार जोरात सुरू होता तेव्हा विशालही मैदानात उतरला होता. त्यांनी आप आमदारांसाठी वोट मागितले होते.