दिल्ली विधानसभा निकालामुळं EVM देखील ‘कनफ्युज’, सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी ‘असा’ व्यक्त केला ‘आनंद’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीमध्ये पुन्हा एकदा आम आदमी पक्षाचे सरकार येणार हे आता निश्चित झाले आहे तर भाजपला आता विरोधात बसावे लागणार आहे. यामुळे सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या पोस्टमुळे मोठा महापूर आल्याचे पहायला मिळत आहे. ट्विटरवर #DelhiElectionResults आणि #DelhiResults ट्रेंडिंगमध्ये आल्याचे समजते.

सोशल मीडियावर दिल्लीतील छोटा मफ्लरमॅन मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्याचे दिसून आले. सुरुवातीच्या निकालाच्या टप्प्यामध्येच आम आदमी पक्षाचे सरकार येणार हे निश्चित झाले आहे.

काँग्रेसला गेल्या वेळेप्रमाणे भोपळाही फोडता आलेला नाही. 1998 ते 2013 पर्यंत दिल्लीवर काँग्रेसचे वर्चस्व होते मात्र आम आदमीने काँग्रेस आणि सध्याच्या केंद्रातील भाजपला ब्रेक लावत दिल्लीवर आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.

आज सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली त्यानंतर हळू हळू निकाल हाती यायला सुरुवात झाली. भाजपच्या जागा वाढल्या असल्या तरी अपक्षेप्रमाणे त्यांना यश मिळाले नाही.

दिल्लीमध्ये एकूण 81,05,236 पुरुष मतदार, 66,80,277 महिला मतदार आणि 869 तृतीय पंथी उमेदवारांसाठी एकूण 13,570 मतदान बूथ लावण्यात आले होते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like