कौतुकास्पद ! केजरीवालांच्या ‘आप’मधील ‘हा’ मराठमोळा आमदार, वडील चालवतात पंक्चरच दुकान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात स्पष्ट झाले कि, दिल्ली वासियांनी पुन्हा एकदा अरविंद केजरीवाल यांच्या हाती सत्ता सोपविली आहे. ७० पैकी ६२ आमदारांना निवडून देत दिल्लीकरांनी केजरीवाल यांना तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनण्याची संधी दिली आहे. या ६२ आमदारांमध्ये एक मराठमोळा आमदारही दिल्ली विधानसभेत निवडून आला आहे. जंगपुरा येथील विधानसभा मतदारसंघातून प्रविण देशमुख हे आमदार म्हणून निवडून आले आहेत.

प्रविण देशमुख दुसऱ्यांदा आपकडून आमदार म्हणून निवडून आलेले आहे. प्रवीण यांचे वडील पी.एन देशमुख मध्य प्रदेशतील भोपाळ येथील रहिवाशी असून गेल्या अनेक वर्षापासून पंक्चरचं दुकान चालवतात. २१ डिसेंबर १९८४ मध्ये प्रविण देशमुख यांचा जन्म झाला. शिक्षणात अव्वल असलेल्या प्रविणने सायन्स पदवीधारक असून एमबीएची डीग्रीही घेतली आहे. त्यांनतर अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला प्रभावित होऊन प्रविण देशमुखने नोकरी सोडली आणि सामाजिक कार्यात सहभागी झाला. प्रविणने अरविंद केजरीवालांच्या आप पक्षाचं काम करत दिल्ली उपाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली. त्यांनतर २०१५ मध्ये दिल्लीत झालेल्या निवडणुकीत प्रत्यक्ष मैदानात उतरत विजयदेखील मिळविला.

दरम्यान, यंदाच्या निवडणुकीत प्रविण देशमुख पुन्हा एकदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. मात्र वडील पीएन देशमुख अजूनही पंक्चर काढण्याचं काम करतात. दिल्लीच्या तख्तासाठी आप पक्षाविरोधात भाजपाने आपली संपूर्ण ताकद पणाला लावत पंतप्रधान, केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे १०० हून अधिक खासदार दिल्लीत प्रचारासाठी आले होते.