दिल्ली विधानसभा निवडणूकीत भाजपाच्या पराभवावर काय बोललं पाकिस्तान ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीने पुन्हा एकदा अरविंद केजरीवाल यांच्या आपला संधी देत सत्तर पैकी 62 जागी आपचे उमेदवार निवडून दिले आहेत तर केंद्रात असलेल्या भाजपला दिल्लीमध्ये केवळ 8 जागांवर समाधान मानावे लागले आहे. देशामध्ये इतर पक्षांकडून देखील याबाबत मत व्यक्त केले गेले तसेच पाकिस्तानकडून देखील निकालावर भाष्य करण्यात आले आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांनी दिल्ली निवडणुकांबाबत आपले मत व्यक्त केले आहे. मंत्री फवाद चौधरी यांनी दिल्ली निवडणुकांबाबत ट्विट केले आहे. यामध्ये ते म्हणतात, Aww, हे काय झाले ? असे म्हणत त्यांनी नरेंद्र मोदी यांचा उल्लेख बिचारा असा केला. निवडणुकीवेळी देखील चौधरी यांनी मोदींवर भाष्य केले होते मात्र केजरीवाल यांनी त्यांना चांगलेच उत्तर दिले होते. केजरीवाल म्हणाले होते, निवडणूक हा आमच्या देशातील अंतर्गत विषय आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आमचे देखील पंतप्रधान आहेत. दहशतवादाचे उगमस्थान असलेल्यांची आमच्यामध्ये हस्तक्षेप करू नहे असे देखील केजरीवाल यांनी ठणकावून सांगितले होते.

पाकिस्तानी मीडियाने देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराभव अशा प्रकारच्या बातम्या दिल्याचे दिसून आले. तसेच केजरीवालांच्या आपने मोदींना हरवले अशा प्रकारचे हेडिंग दिले दिल्याचे दिसून आले. पाकिस्तानातील जिओ न्यूज ने देखील हेडिंग दिले आहे की मोदींच्या अँटी पाकिस्तानी अजेंड्यामुळे भाजपला मोजावी लागली मोठी किंमत.

पाकिस्तानी मीडियाने भाजपने सत्ता गमावलेल्या इतर राज्यांचा देखील यावेळी उल्लेख केला तसेच भाजपने शेवटच्या दिवशी शाहीन बाग येथील आंदोलन संपवायचे असेल तर भाजपला मतदान करा असा प्रचार केला मात्र जनतेने केजरीवालांना निवडणून दिल्याचे देखील मीडियाद्वारे सांगण्यात आले.

एक्सिट पोल नंतर भाजप पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सीएए निर्णयामुळे पराभवाच्या छायेत असल्याची टीका पाकिस्तानी मंत्री शाह कुरेशी यांनी केली होती. तसेच 2019 मध्ये केंद्रात आलेल्या भाजप सरकारला इतर राज्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागल्याचे देखील कुरेशी यांनी म्हंटले होते.