दिल्ली विधानसभा : भाजपामध्ये परवेश वर्मा Vs मनोज तिवारी, मतदानापुर्वीच ‘मुख्यमंत्री’ पदासाठी दावेदारी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली निवडणूकीपूर्वीच मुख्यमंत्री पदाचा दावेदार कोण यावरुन भाजपमध्ये रेस सुरु झाली आहे. दिल्ली निवडणूकीत मनोज तिवारी सर्वात पुढे दिसत होते परंतु जसं जसे राजकीय वातावरणात रंग चढत गेले तसं तसे खासदार प्रवेश वर्मा यांच्या राजकीय जबाबदारीत वाढ करण्यात आली आहे. अमित शाह यांनी शाहीन बाग मुद्यावरुन दिलेले आक्रमक रुप प्रवेश वर्मा यांनी पुढे नेले आणि निवडणूक भाजपच्या बाजूने झुकवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले. त्यामुळे जर 22 वर्षाच्या वनवासानंतर जेव्हा दिल्ली भाजप पुन्हा सत्तेत आले तर मुख्यमंत्रिपदासाठी मनोज तिवारी आणि प्रवेश वर्मा यांच्यात जोरदार चूरस असेल.

आपल्या विवादास्पद वक्तव्याने प्रवेश वर्मा यांनी भाजपला चर्चेच आणले. प्रवेश वर्मा म्हणाले होते की शाहीन बागमध्ये लोक जमा होत असतील तर दिल्लीतील लोकांनी विचार केला पाहिजे. निर्णय घेतला पाहिजे. एक दिवस तुमच्या घरात घुसतील आणि तुमच्या बहिणी- मुलींवर बलात्कार करतील, त्यांना मारुन टाकतील. अजूनही वेळ गेलेली नाही. उद्या पंतप्रधान मोदी आणि अमित शाह तुम्हाला वाचवण्यासाठी येणार नाहीत.

प्रवेश वर्मा यांना आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे भाजपच्या स्टार प्रचारक यादीतून बाहेर काढण्यात आले होते. त्यानंतर देखील ते अशी वक्तव्य करत राहिले. त्यानंतर निवडणूक आयोगाने त्यांच्या प्रचारावर प्रतिबंध आणला. परंतु त्यांची ओळख भाजपचे फायर बॉन्ड नेता म्हणूनच झाली. दिल्लीत कमळ फुलेल की नाही हे 11 फेब्रुवारीला कळेल परंतु प्रवेश वर्मा यांचे राजकीय प्रभुत्व मात्र वाढले आहे. अशी ही चर्चा आहे की त्यांच्याकडून करण्यात येणारी वादग्रस्त विधानं राजकारणचा एक भाग आहेत.

जानेवारी महिन्यात बुथ कार्यकर्त्यांच्या संमेलनात पंच परमेश्वरमध्ये त्यांनी एकट्या ने सर्व कमान संभाळली होती. बूथ जिंकला, निवडणूक जिंकली असे नारेबाजी करत अमित शाह यांनी देखील प्रवेश वर्मा यांचे कौतूक केले होते.

पंतप्रधान मोदी जेव्हा रामलीला मैदानावर निवडणूक प्रचारासाठी गेले होते तेव्हा रॅलीवेळी त्यांचे स्वागत जाट नेता प्रवेश वर्मा यांनीच केले होते. मंचावर भाजप अध्यक्ष प्रकाश नड्डा होते तरी देखील पंतप्रधानांच्या स्वागताची जबाबदारी प्रवेश शर्मा यांच्यावर देण्यात आली.

प्रवेश वर्मा यांची खूर्ची यावेळी पंतप्रधान मोदींच्या बाजूला होती. यादरम्यान त्यांनी एकमेकांशी बातचीत देखील केली. त्यामुळे त्यांच्या राजकारणाचे विविध अंदाज बांधले जात आहेत त्यामुळे मुख्यमंत्री पदासाठी दावेदार असलेले मनोज तिवारी यांची चिंता वाढली आहे.

दिल्लीत भाजपने कोणालाही मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून पुढे केलेले नाही. परंतु दिल्ली भाजपचे प्रदेशाध्यक्ष या नात्याने ते मुख्यमंत्री पदाचे दावेदार मानले जात आहेत. त्यामुळे केजरीवाल देखील मनोज तिवारीवर टीका करत आहेत. त्यामुळे मनोज तिवारी आणि प्रवेश वर्मा यांच्यात निवडणूकीपूर्वीच मुख्यमंत्रिपदावरुन रेस होणार असे दिसते आहे.