‘व्हेलेंटाईन डे’ आणि CM अरविंद केजरीवालांचं ‘असं’ आहे अनोखं ‘कनेक्शन’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार येणार हे आता जवळ जवळ निश्चित झाले आहे. त्यामुळे आता केजरीवाल हे पुन्हा एकदा व्हेलेंटाईन डेच्या दिवशी मुख्यमंत्री पदाची शपत घेऊ शकतात. 8 फेब्रुवारी रोजी झालेल्या निवडणुकीचे निकाल आज सकाळी यायला सुरुवात झाली आहे. त्यावरून पुन्हा एकदा आपचे सरकार येणार हे आता निश्चित झाले आहे.

गेल्या दोन विधानसभा निवडणूका देखील व्हेलेंटाईन डेच्या आसपास झाल्या होत्या आणि यावेळी देखील निकालानंतर व्हेलेंटाईन डे येणार आहे. त्यामुळे केजरीवाल आणि व्हेलेंटाईन डे चे एक वेगळेच नाते असल्याचे समोर आले आहे.

2013 च्या दिल्ली विधानसभा निवडणूका
2013 मध्ये 4 डिसेंबरला विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि 8 डिसेंबरला निकाल जाहीर करण्यात आले होते. या निवडणुकीत भाजपला 31, आम आदमी पार्टीला 28 तर काँग्रेसला 8 जागा मिळाल्या होत्या. निवडणूक त्रिशंकू झाल्याने कोणालाच बहुमत मिळाले नाही. आपने काँग्रेसशी हात मिळवणी करत सरकार स्थापन केले आणि 28 डिसेंबर रोजी केजरीवालांनी मुख्यमंत्री पदाची शपत घेतली.

त्यानंतर काँग्रेस आणि आपमध्ये वाद झाले आणि केजरीवालांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी 14 फेब्रुवारी 2014 हा दिवस निवडला. हे सरकार केवळ 49 दिवस चालले आणि त्यानंतर दिल्लीमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली.

2015 दिल्ली विधानसभा निवडणूक
निवडणूक आयोगाने 12 जानेवारी 2015 रोजी निवडणुकांची घोषणा केली आणि यावेळी आप कडून अशी घोषणा करण्यात आली की, दिल्लीच्या रामलीला मैदानावर 14 फेब्रुवारी रोजी केजरीवाल मुख्यमंत्री पदाची शपत घेतील आणि दिल्लीचे व्हेलेंटाईन होतील. त्यानंतर 10 फेब्रुवारी रोजी या निवडणुकांचा निकाल लागला ज्यामध्ये आपला 67 जागा तर भाजपला तीन जागा मिळाल्या होत्या. विशेष म्हणजे काँग्रेसला या निवडणुकीत एकही जागा मिळाली नव्हती.

2018 मध्ये, ‘आप’ सरकारने तीन वर्षे पूर्ण केल्याबद्दल 14 फेब्रुवारी रोजी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमात डीयूच्या विद्यार्थिनी कृतिकाने केजरीवाल यांना व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा दिल्या आणि विचारले, ‘जेव्हा एखादा वर्ग देशात द्वेष पसरवत आहे, अशा वेळी तुम्ही तरुणांना काय संदेश देऊ इच्छिता.
यावर केजरीवाल म्हणाले, द्वेषाचे उत्तर द्वेषाने द्यायचे नसते. द्वेषाने फक्त प्रेमाने उत्तर दिले जाऊ शकते.

त्यामुळे आज जवळजवळ दिल्लीमध्ये आपचे सरकार येणार हे निश्चित झाले आहे त्यामुळे केजरीवाल पुन्हा एकदा 14 फेब्रुवारी अर्थात व्हेलेंटाईन डेच्या दिवशी मुख्यमंत्री पदाची शपत घेऊ शकतात.