HM अमित शाहांचे पोस्टर फडकवत AAP च्या कार्यकर्त्यांनी विचारलं – ‘करंट लागलं का ?’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली विधानसभेत आपचा प्रचंड विजय झाला आहे. यानंतर आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते ढोल ताशाच्या गजरात जल्लोष करत आहेत. या जल्लोषादरम्यान आपच्या कार्यालयात एक पोस्टर दिसला, ज्यावर अमित शाहांचा फोटो असून त्यावर लिहिले होते करंट लागला का ?

या जल्लोषात आपचे कार्यकर्ते नाचत हा पोस्टर उडवत आहेत. दिल्लीत शाहीन बागला भाजपने मुद्दा बनवला होता आणि अमित शाहा खुद्द केजरीवाल यांच्याविरोधात प्रचारासाठी उतरले होते. एका सभेत अमित शाह म्हणाले होते की दिल्लीकरांनी ईव्हीएमचे बटन इतके जोरात दाबावे की मतदान येथे मिळेल आणि करंट शाहीन बागला लागेल.

अमित शाहासह कपिल मिश्रा, परवेश वर्मा या नेत्यांनी शाहीन बाग आंदोलन आपच्या पाठिंब्याने सुरु आहे असे सांगितले. अमित शाहांनी शाहीन बागमधील आरक्षण राजकारणाने प्रेरित असल्याचे सांगितले. ते म्हणाले की दिल्लीचा निकाल सांगेल की ते शाहीन बाग सोबत आहेत की भारत माता असा नारा लावणाऱ्यासोबत.

मॉडल टाऊनमधील भाजप उमेदवार कपिल मिश्रा यांनी ट्विट करत शाहीन बागला मिनी पाकिस्तान सांगितले होते, त्यानंतर निवडणूक आयोगाने त्यांच्यावर बंदी आणली होती. तर भाजप खासदार परवेश वर्मा म्हणाले की लोक तुमच्या घरात घुसतली आणि तुमच्या आई बहीणीचा बलात्कार करतील आणि तुम्हाला मारुन टाकतील.

असे असले तरी शाहीन बाग परिसर येत असलेल्या ओखला मतदार संघातील आपचे उमेदवार अमानतुल्लाह खान विजयाच्या दिशेने घौडदौड करत आहेत. दिल्लीत आप सरकार सत्तेत होणार हे निकालाच्या कलावरुन स्पष्ट होत आहे. भाजप 55 – 60 जागांवर विजयी होऊ शकते तर भाजप 10 – 8 जागांवर विजय होऊ शकते.