बोगस ID तयार करून MBA चा IPS झाला, युवतीशी फेसबुकवर मैत्री केल्यानंतर केला बलात्कार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली पोलिसांनी एक व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. हा व्यक्ती स्वत:ला आयपीएस अधिकारी असल्याचे सांगत होता आणि खोटे आयडी बनवून तो लोकांची फसवणूक करत होता. विशेष म्हणजे खोटे सांगून तो मुलींना फसवत होता. पूर्व दिल्लीतील मयूर विहार पोलिसांनी पीयुष नामक आरोपीला अटक केली आहे.

पीयुष कडून एनसीबीचे खोटे आयडी कार्ड जप्त केले आहे. त्याबरोबरच काही अन्य कागदपत्र जप्त करण्यात आली आहे. खरंतर त्याच्याकडे एमबीएची डिग्री आहे.

पीयुषवर बलात्काराचा गुन्हा दाखल –

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीयुष फेसबुकवर एक मुलीशी संपर्कात होता, त्यानंतर मुलीने बलात्कराचा गुन्हा दाखल केला. परंतू पीयुष फरार होता. अखेर त्याला न्यु अशोक नगरच्या घरातून अटक करण्यात आली.

पीयुष कडून ग्रँड आय 10 कार जप्त करण्यात आली आहेत. त्यावर भारत सरकार लिहिण्यात आले होते. आरोपी पीयुषने मॅट्रोमोनियल साइटवर आपले अकाऊंट तयार केले आहे. यात त्याने प्रोफाइलवर NCB, ACP लिहिले आहे.

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीने खोटे आईडी कार्ड बनवले आहे, असे असले तरी त्यांने मुलींना फसवण्याबाबत केलेल्या आरोपांना नकार दिला आहे.

सिने जगत –

#Video : ‘तशा’ अवस्थेत नृत्य करून प्रियंका चोपडाने ‘हॉटनेस’च ‘दर्शन’ दिल्याने वातावरण ‘टाईट’

‘या’ टॉप ५ अभिनेत्री अति ‘गर्विष्ट’पणा, ‘वाईट’ वागणुकीसाठी ओळखल्या जातात, घ्या जाणून

बांगलादेशाची ‘सनी लिओनी’ देत आहे बॉलिवूडच्या अभिनेत्रींना ‘टक्‍कर’, पहा फोटोज्

‘या’ खास कारणामुळे ‘छपाक’मधील लक्ष्मीच्या रोलसाठी दीपिकाचीच निवड !

You might also like