दिल्ली हिंसाचार : 100KM पर्यंत पाठलाग केल्यानंतर 50 हजारांचे बक्षीस असलेला आरोपी ताब्यात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 26 जानेवारीला लाल किल्ल्यावरील हिंसााचार प्रकरणात दिल्ली पोलिसांनी 50 हजार रुपयांचे बक्षीस असणाऱ्याला अटक केली. विशेष बाब म्हणजे पोलिसांनी सुखदेव सिंगचा 100 किलोमीटरहून अधिक काळ पाठलाग केल्यानंतर त्याला अटक केली आहे. यानंतर दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपींना दिल्लीत आणले.

गुन्हे शाखेच्या एसआयटीला लाल किल्ला प्रकरणातील आरोपी सुखदेवचे ठिकाण करनाल येथे असल्याची माहिती मिळाली होती. सुखदेव करनालचा रहिवासी आहे. गुन्हे शाखेची एसआयटीची टीम सुखदेवसिंगच्या घरी पोहोचली, परंतु त्याआधी आरोपीला भनक लागली आणि संधी मिळताच तो फरार झाला. नंतर पोलिसांना लोकेशन मिळाले की, सुखदेव गाडीने चंदीगडकडे जात आहे. एसआयटीची टीम सुखदेवचा पाठलाग करत चंदीगडला पोहोचली. तेथेही सुखदेवने पोलिसांची दिशाभूल केली, परंतु त्यांची कार ओळखली गेली. चंदीगडमधील औद्योगिक क्षेत्रातील सेंट्रा मॉलजवळ सुखदेवला पकडण्यात आले.

दरम्यान, कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सींघू, गाजीपूर आणि टिकरी सीमांवर शेतकरी आंदोलन करीत आहेत. याच अनुक्रमे शेतकऱ्यांनी दिल्लीत ट्रॅक्टर परेड काढला. या परेड दरम्यान दिल्लीच्या आयटीओ आणि लाल किल्ल्यासह अनेक भागात हिंसाचार झाला. दिल्ली पोलिस सातत्याने हिंसाचाराच्या आरोपींची ओळख पटवत आहेत आणि त्यांना अटकही केली जात आहे.