Delhi Fierce Fire | दिल्लीत इमारतीला भीषण आग; 26 जणांचा होरपळून मृत्यू, अनेकजण जखमी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Delhi Fierce Fire | दिल्लीत एका इमारतीला भीषण आग लागल्याची खळबळजनक घटना (Delhi Fierce Fire) घडली आहे. मुंडका मेट्रो स्थानकाजवळच्या (Near Mundka Metro Station) इमारतीला लागलेल्या आगीत 26 जण मृत्यूमुखी (Died) पडले आहेत. तसेच 12 जणाहून जादा जखमी (Injured) झाले आहेत. आगीने वेढलेल्या या इमारतीतून जवळपास 70 लोकांची सुटका केली असून आणखी काही लोक अडकले असल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात आली. (26 killed in Delhi building fire)

 

मुंडका स्थानक जवळच्या व्यावसायिक संकुलाच्या 3 मजली इमारतीला संध्याकाळी 4.40 च्या सुमारास आग लागली. सीसीटीव्ही कॅमेरे आणि राऊटर तयार करणा-या कंपनीचे कार्यालय इमारतीच्या पहिल्या मजल्यावर प्रथम आगीचा भडका उडाला होता. त्यानंतर ती दुसऱ्या मजल्यावर पसरली. दरम्यान, आग आटोक्यात आणण्यासाठी 27 बंब शर्थीने प्रयत्न करीत होते, अशी माहिती अग्निशमन सेवेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी (Fire Brigade Senior Officers) दिली आहे. (Delhi Fierce Fire)

 

 

आगीत वीस जणांचा होरपळून अथवा गुदमरून मृत्यू झाला, तर अनेकजण जखमी झाले आहेत,
अशी माहिती पोलीस उपायुक्त समीर शर्मा (DCP Sameer Sharma) यांनी दिली आहे.
तसेच, ही आग भीषण असून आतापर्यंत, आम्ही पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरून 26 मृतदेह बाहेर काढले आहेत.
सर्व मृतदेह ओळखण्यापलिकडे आहेत, असं दिल्ली अग्निशमन विभागाचे प्रमुख अतुल गर्ग (Atul Garg) यांनी सांगितलं.

 

Web Title :- Delhi Fierce Fire | building fire delhi 26 killed injured mundka metro near station building fire bridged department

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा