अरे देवा ! राजधानी दिल्लीत इमारतीला आग लागून 6 जणांचा मृत्यु, 11 गंभीर जखमी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीतील जाकीरनगर भागात एका इमारतीला लागलेल्या आगीत ६ जणांचा मृत्यु झाला असून ११ जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आगीत २ पुरुष, २ महिला आणि २ मुलांचा समावेश आहे.

येथील जाकीरनगर या इमारतीत १३ फ्लॅट आहेत. पहाटे २ वाजण्याच्या सुमारास इमारतीच्या मीटर बोर्डजवळ शार्ट सर्कीट होऊन ही सर्वत्र पसरली. त्यात घरातील वायरिंग जळून आतील सामानाना आग लागली. झोपेत असल्याने कोणाला सुरुवातीला काहीच समजले नाही. त्यामुळे काही जणांचा झोपेतच भाजून मृत्यु झाला.

मीटर बोर्डला लागलेल्या आगीमुळे पार्किंगमध्ये ठेवलेल्या ७ कार आणि आठ दुचाकींना आग लागून त्या त्यात भस्मसात झाला. पोलिसांनी जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यातील काही जणांची प्रकृती गंभीर आहे. फ्लॅटमध्ये मिळालेले मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनाला पाठवून दिले आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

Loading...
You might also like