दुर्दैवी ! मांजाने गळा कापल्याने 5 वर्षीय मुलीचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दुचाकीवरून जाताना पतंगाच्या मांजाने गळा कापला गेल्याने 5 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला. इशिका असं या मृत मुलीचं नाव असून दिल्लीच्या खजूरी खास येथे ही घटना घडली. या प्रकरणात पोलिसांनी कलम 304 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर मुलगी कुटुंबीयांसहित जमुना बाजार येथील हनुमान मंदिरात दर्शन घेण्यासाठी जात असताना ही दुर्दैवी घटना घडली. ही लहान मुलगी आपल्या वडीलांसोबत बाईकवर पुढे बसली होती. त्यावेळी रस्त्यात पतंगीचा मांजा मुलीच्या गळ्याला लागल्याने तिचा गळा कापला गेला. या घटनेनंतर मुलीला रुग्णालयात नेण्यात आलं पण उपचारापूर्वीच मुलीचा मृत्यू झाला.

गेल्या काही दिवसांमध्ये मांजामुळे अपघात झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने बंदी २०१७ मध्ये नायलॉन विक्रीवर पूर्णपणे बंदी आणली होती. मात्र, त्याची अंमलबजावणी कठोरपणे होताना दिसत नाही.

आरोग्यविषयक वृत्त –