धक्कादायक ! प्रवासात अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवणे ‘तिला’ पडले महागात ; चौघांनी केला सामुहिक बलात्कार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नेपाळहून मुंबईला निघालेल्या तरुणीला प्रवासात अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवणे महागात पडले. तिच्यावर चार जणांनी दिल्लीच्या द्वारका परिसरात सामूहिक बलात्कार केला. या प्रकरणी मुंबईत आल्यावर तिने ओशिवरा पोलिसांत तक्रार दाखल केल्यावर हा प्रकार उघडकीस आला.

ही २२ वर्षांची तरुणी मुंबईत राहणाऱ्या तिच्या भावाला भेटण्यासाठी नेपाळहून दोन दिवसांपूर्वी निघाली होती. नेपाळहून दिल्लीला ती बसने आली. तिला तिथून मुंबईत जाणारी गाडी पकडायची होती. मात्र प्लॅटफॉर्मवर पोहोचायलाच तिला उशीर झाला. त्या वेळी एका व्यक्तीने तिची चौकशी सुरू केली. रात्री उशिरा प्लॅटफॉर्मवर राहणे सुरक्षित नसल्याचे सांगत तो तिला सोबत द्वारका परिसरात घेऊन गेला. त्याच्यावर विश्वास ठेवत ती त्याच्यासोबत गेली. तेथे त्या इसमासह चौघांनी तिच्यावर बलात्कार केला. त्यांच्या तावडीतून कशीबशी सुटका करुन घेऊन ही तरुणी मुंबईला आली. आपल्याबाबत घडलेल्या घटनेची माहिती तिने भावाला दिली. त्यानंतर त्यांनी ओशिवरा पोलिसांकडे येऊन फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी तिची फिर्याद नोंदवून घेतली असून ती अधिक तपासासाठी दिल्ली पोलिसांकडे पाठविण्यात येणार आहे.

Loading...
You might also like