भर रस्त्यात गोळ्या घालून कापड व्यापाऱ्याचा खून

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजधानी दिल्लीत गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिलेला नाही हे पुन्हा एकदा समोर आले आहे. दिल्लीतील करोलबागमध्ये एका कापड व्यापाऱ्याची अज्ञाताने गोळ्या घालून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. ३२ वर्षीय मृत व्यक्तीचे नाव मोहित उर्फ मिथुन असून तो रेडिमेड कापड विकण्याचे काम करत होता. त्याला तीन मुली असून तो घरातील एकटाच कमावणारा होता. यासंबंधी प्रसाद नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलीस तपास करत आहेत.

शनिवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली असून, घटनेच्या वेळी तो आपल्या मुलीला औषध द्यायला चालला होता. यावेळी अज्ञात हल्लेखोराने त्याला गोळी घातली. यात तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर शेजाऱ्यांनी त्याला दवाखान्यात दाखल केले. मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. त्याच्या पत्नीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार त्याचा कुणाशीही वाद नव्हता.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी त्याचा मित्रांशी किरकोळ वाद झाला होता, त्यापैकी कुणी त्याची हत्या केली असेल का ? यादृष्टीने देखील तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी देखील दिल्लीत एका लोखंड व्यापाऱ्याची देखील भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्यामुळे पुन्हा एकदा पोलिसांच्या क्षमतेवर आणि तपासावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

‘हे’ पदार्थ चुकूनही ठेवू नका तांब्याच्या भांड्यात, ठरू शकतात विषारी

पुरुषांनी शुक्राणू वाढीसाठी करावेत ‘हे’ रामबाण उपाय

पौरुषत्व कायम ठेवण्यासाठी ‘हे’ आहेत रामबाण आयुर्वेदीक उपाय

अवघ्या २ रुपयांत कॅन्सरवर उपचार शक्य, एका डॉक्टरचा दावा