दिल्ली घराण्याचे संगीतकार उस्ताद इकबाल अहमद खान यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन !

पोलिसनामा ऑनलाईन – दिल्ली घराण्याचे गायक उस्ताद इकबाल अहमद खान (Iqbal Ahmad Khan) यांचं गुरुवारी निधन झालं आहे. ते 66 वर्षांचे होते. त्यांच्या कुटुंबातील एका सदस्यांनी याबाबत माहिती दिली आहे. उस्ताद इकबाल यांचे जावई इम्रान खान यांनी सांगितलं की, गुरुवारी प्रार्थनेदरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला. यानंतर आम्ही त्यांना दरियागंजमधील एका रुग्णालयात घेऊन गेलो. त्यांना तिथं मृत घोषित करण्यात आलं. त्याच्या निधनानंतर गायक आणि संगीतकार विशाल ददलानी (Vishal Dadlani) यानंही ट्विट करत दु:ख व्यक्त केलं आहे.

दिल्ली घराण्याचे संरक्षक उस्ताद इकबाल अहमद खान यांना भारतीय शास्त्रीय संगीतातील विविध शैली ठुमरी, दादरा, भजन आणि गझल यांमधील अष्टपैलू प्रतिभेसाठी ओळखलं जातं.

विशाल ददलानी व्यतिरीक्त दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia), सरोद वादक अजमद अली खान (Amjad Ali Khan) यांनी ट्विट करत दु:ख व्यक्त केलं आहे.

इकबाल अहमद खान यांना प्रियदर्शनी पुरस्कार (2001), राजीव रतन सद्भभावना पुरस्कार (2003) सहित अनेक पुरस्कारनं गौरवण्यात आलं आहे. गुरुवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.