कन्हैया कुमारवर चालणार देशद्रोहाचा खटला, दिल्ली सरकारनं दिली मंजूरी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कन्हैया कुमारावर देशद्रोहाचा खटला चालवण्यावर दिल्ली सरकारने शुक्रवारी मंजुरी दिली आहे. जेएनयूमध्ये राष्ट्रविरोधी घोषणाबाजीच्या कथित आरोपांतर्गत खटला चालवण्यास दिल्ली सरकारची मंजुरी हवी होती, जी आता देण्यात आली आहे. 9 फेब्रुवारी 2016 साली 2002 च्या संसद हल्ल्यातील दहशतवादी अफजल गुरु यांच्या फाशी वर्ष पूर्ण होत असताना जेएनयू परिसरात देश विरोधी घोषणाबाजी करण्यात आली होती.

दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने 1200 पानांचे आरोप पत्र दाखल केले होते आणि कन्हैया कुमार, उमर खालिद, अनिर्बान भट्टाचार्य तसेच अन्य 7 काश्मीरी विद्यार्थ्यांना मुख्य आरोपी बनवण्यात आले होते.

यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने 24 फेब्रुवारीला जेएनयूच्या विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमारच्या विरोधात 2016 च्या देशद्रोह प्रकरणासंबंधित मंजुरी देण्यासाठी दिल्ली सरकारला निर्देश देण्याची मागणी करणारी याचिका रद्द बातल ठरवली होती. मुख्य न्यायाशीध एस. ए. बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने सांगितले होते की, न्यायालय अशा सामान्य विनंतीसाठी असे करु शकत नाही.

खालच्या न्यायालयाने देखील दिल्ली सरकारने निर्देश देण्यास नकार दिला होता. ज्यानंतर वकील शशांक देव सुधी यांनी दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. डीओ सुधी म्हणाले होते की, तीन महिन्याच्या आता स्वीकृतीचा निर्णय दिला गेले जाणार होता परंतु हे प्रकरण दिल्ली सरकारकडे मागील 1 वर्षापासून प्रलंबित आहे.