Delhi Government | DL-RC सह RTO संबंधीत ‘या’ कामांचा कालावधी वाढला, जाणून घ्या आता कोणत्या तारखेपर्यंत बनवू शकता Learning License

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली सरकारने (Delhi Government) वाहन चालकांना मोठी खुशखबर दिली आहे. केजरीवाल सरकारने फेब्रुवारी 2020 पासून नोव्हेंबर 2021 च्या दरम्यान समाप्त होणार्‍या लर्निंग लायसन्स (Learning License) ची कालमर्यादा (व्हॅलिडिटी) आता 31 जानेवारी 2022 पर्यंत वाढली आहे. कोविड -19 (Covid-19) मुळे ड्रायव्हिंग लायसन्स (DL) सारख्या मोटर वाहन कागदपत्रांची वैधता दोन महिन्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. (Delhi Government)

 

लोकांना परमनंट लायसन्स मिळवण्यासाठी ड्रायव्हिंग टेस्ट स्लॉट बुक करण्यात अडचण येत होती. दिल्ली सरकारचा हा आदेश वर्षाच्या अखेरपर्यंत परमिट, फिटनेस आणि नोंदणी प्रमाणपत्रासह परिवहन संबंधीत विविध कागदपत्रांसाठी सुद्धा मान्य होईल.

 

दिल्लीचे परिवहन मंत्री कैलाश गेहलोत यांनी परिवहन विभागाचे एक वक्तव्य जाहीर करताना म्हटले, लोकांची विनंती लक्षात घेऊन आणि ड्रायव्हिंग लायसन्स चाचणीसाठी स्लॉट प्राप्त करण्यात दिल्ली लर्निंग लायसन्स धारकांना येणार्‍या अडचणी लक्षात घेऊन आम्ही लर्निंग लायसन्सची वैधता आता 31 जानेवारी 2022 पर्यंत वाढवली आहे, जी 01.02. 2020 आणि 30.11.2021 च्या दरम्यान समाप्त झाली होती.

 

दिल्लीत लर्निंग लायसन्स बनवण्याची कालमर्यादा वाढवली

परिवहन विभागाने आपल्या फेसलेस सर्व्हिस मॉडल अंतर्गंत ई-लर्नर लायसन्स सुविधा सुरू केली आहे जी अर्जदाराला घर किंवा कामाच्या ठिकाणी ड्रायव्हिंग टेस्ट देण्याची परवानगी देते. (Delhi Government)

 

आता दिल्लीत लर्नर लायसन्स हवे असणारे ऑनलाइन अर्ज करून स्लॉट बुक करू शकतात. अर्जदारांना विभागाच्या कोणत्याही कार्यालयात न जाता ड्रायव्हिंग टेस्ट देण्यासाठी स्लॉट दिले जातात. चाचणी पास झाल्यानंतर लायसन्स अर्जदाराच्या पत्त्यावर पाठवले जाते.

 

Web Title :- Delhi Government | driving license rc expired now extends deadline date for renewal till 31 january 2022 driving licence dl news rto

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

NABARD Recruitment 2021 | नोकरीची सुवर्णसंधी ! राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत लवकरच भरती; पगार 3.75 लाख रुपये प्रतिवर्ष

PAN Card | अर्जंट पाहिजे पॅनकार्ड ! मोबाईल नंबरच्या मदतीने तयार होईल केवळ 10 मिनिटात, जाणून घ्या कसा करावा अर्ज

Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांंची टीका; म्हणाले – ​’शिवसेनेचा पासिंग स्ट्राईक रेट होता, पण आमचा…’

Pune Crime | सरपंच, उपसरपंचाच्या त्रासाला कंटाळून ग्रामपंचायत शिपायाने कार्यालयातच घेतला गळफास; परिसरात खळबळ

UGC Scholarship 2021 | विद्यार्थ्यांनी भरावा यूजीसी शिष्यवृत्ती योजनेचा अर्ज, मिळतील 7,800 Rs प्रति महिना; जाणून घ्या

Pune News | अ‍ॅड. मधुकर वाघमारे लिखित ‘मधुपुष्प’चा प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न ! अविनाश महातेकर म्हणाले – ‘आत्मचरित्र हे सामाजिक दस्तावेज असतात’