…तर मोदी सरकारकडून ‘कांदा’ मिळू शकतो 15.60 रुपये ‘प्रतिकिलो’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कांद्याने सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणल्यानंतर दिल्ली सरकारने गुरुवारी केंद्र सरकारला विनंती केली की त्यांनी दिल्लीत कांद्याच्या पुरवठ्याची पूर्तता करावी आणि 60 रुपये प्रति किलोचा ऐवजी 15.60 रुपये प्रति किलो या दराने उपलब्ध करुन द्यावा.

दिल्लीचे खाद्य आणि नागरिक पुरवठा मंत्री इमरान हुसैन यांनी सांगितले की असे नाही वाटले पाहिजे की सरकार आवश्यक खाद्य पदार्थांवर नफा कमावत आहे. हुसैनने आरोप लावला की भारतीय राष्ट्रीय कृषि सहकारी विपणन संघाने (नाफेड) कांद्याचा पुरवठा बंद केला आहे. नाफेडकडून सांगण्यात आले की दिल्लीत कांदा उपलब्ध करुन देण्यासाठी कांदा खरेदी करावा लागेल आणि त्यानंतर इजिप्तमधून आयात होणाऱ्या कांद्याची टप्प्या टप्प्याने खरेदी होईल.

महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे मध्यप्रदेशात वाढले कांद्याचे दर
देशातील कांद्याचा मुख्य उत्पादक महाराष्ट्र आहे. परंतू महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे मध्यप्रदेशात सर्व भाज्यांचे दर वाढले आहेत. राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या इंदौरच्या किरकोळ बाजारात गुरुवारी कांद्याचे दर 90 रुपये प्रति किलोपर्यंत पोहचले. बाजारात कमी कांदा येत असल्याने कांद्याचे भाव गगनाला भिडले आहेत.

सरकारी गोदामात सडला 32 हजार टन कांदा
बुधवारी संसदेत केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी सांगितले की या वर्षी जास्त पाऊस झाल्याने कांदा उत्पादनात 26 टक्क्याने घसरण आली आहे. ते असे ही म्हणाले की 65,000 टन कांदा बफर स्टॉक (गोदामात) मध्ये होता पंरतू त्यातील 50 टक्के कांदा सडला आहे. देशातील अनेक राज्यात कांद्याचे दर गगनाला भिडले आहेत. दिल्ली, कोलकत्ता, चेन्नईमध्ये कांदा 100 ते 120 रुपये किलोने मिळत आहे. व्यवसायिकांचे म्हणणे आहे की जर बाजारात कांद्याचा पुरवठा वाढला नाही तर किंमती आणखी वाढू शकतात.

Visit : Policenama.com