खुशखबर ! ‘या’ राज्यातील नागरिकांना सरकारकडून महिन्याला 15 GB डाटा एकदम ‘फ्री’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीतील नागरिकांना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोठे बक्षीस दिले असून यापुढे नागरिकांना महिन्याला १५ जीबी डेटा मोफत मिळणार आहे. राज्य सरकार राज्यभरात वाय-फाय हॉटस्पॉट बसवणार असून यामुळे सर्व नागरिकांना मोफत इंटरनेट वापरण्यासाठी मिळणार आहे. या इंटरनेटचा स्पीड हा ५० एमबीपीएस पर्यंत असणार आहे. हा डेटा नागरिक एका दिवसात देखील वापरू शकतात किंवा संपूर्ण महिन्याभरात देखील वापरू शकतात. यासाठी राज्य सरकार ११ हजार ठिकाणी वाय-फाय हॉटस्पॉट बसवणार असून यावर सुमारे १०० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

प्रत्येक विधानसभा क्षेत्रात १०० वाय-फाय
सरकारच्या योजनेनुसार प्रत्येक विधानसभा क्षेत्रात १०० वाय-फाय पॉईट बसवण्यात येणार असून ७० विधानसभा क्षेत्रात ७००० पॉईट बसवण्यात येणार आहेत. ४००० बस स्थानकांवर देखील हे पॉईट बसवण्यात येणार असून ५० ते ६० मीटर अंतरावर याचे कनेक्टिव्हीटी अंतर असेल. पहिल्या टप्प्यात बस स्थानकांवर हे पॉईट बसवण्यात येणार असून दुसऱ्या टप्यात मतदारसंघांमध्ये पॉईट बसवण्यात येणार आहेत. विधानसभा क्षेत्रांमध्ये सार्वजनिक ठिकाणे, पार्क त्याचबरोबर भाजी मंडई सारख्या ठिकाणी हे पॉईट बसवण्यात येणार आहेत.

एकदाच करावे लागणार लॉग इन
दिल्लीत तुम्हाला कुठेही वाय-फाय वापरायचे असल्यास प्रत्येकाला एका वन टाइम पासवर्ड मिळेल. यामध्ये लॉग-इन केल्यानंतर तुम्ही त्याआधारे राज्यात कुठेही तुम्ही वाय-फाय वापरू शकता. त्याचबरोबर एका पॉईटवर एकावेळी १५० नागरिक इंटरनेट वापरू शकणार आहेत. त्यानंतर अधिक लोकांनी वापरण्याचा प्रयत्न केला तर पहिल्या व्यक्तीचे अकाउंट बंद होईल. त्याचबरोबर तुमचे महिन्याचे १५ जीबीचे लिमिट संपल्यानंतर तुम्हाला इंटरनेट वापरता येणार नाही.

आरोग्यविषयक वृत्त