Coronavirus : जमातीमधील लोक दिल्लीत कुठे-कुठे फिरले, पोलीस करणार तपास, सरकारने दिले नंबर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  दिल्लीतील केजरीवाल सरकारने तबलिगी जमातशी संबंधित जवळपास 1950 लोकांचे मोबाइल नंबर दिल्ली पोलिसांना दिले आहेत. या सर्वांना 25 मार्च रोजी निजामुद्दीनमधील तबलिगी जमातच्या मरकजमधून बाहेर काढले होते. मरकजमधून बाहेर काढलेल्या लोकांनी 25 मार्चपूर्वी कोणा कोणाला भेटले होते याची माहिती घेण्यासाठी दिल्ली सरकारने पोलिसांना मोबाईल नंबर दिले आहेत. याच नंबरवरून हे लोक कोणाला भेटले होते याची माहिती घेण्यास पोलिसांना सांगण्यात आले आहे.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवार यांनी मंगळवारी (दि.7) सांगितले की, जमातमधील लोक ज्यांना भेटले होते, त्या सर्वांना क्वारंटाईन करण्यात येईल आणि त्यांच्या सर्व चाचण्या घेण्यात येतील. यापूर्वी दिल्ली सरकारने 27,302 नंबर दिल्ली पोलिसांना दिले होते. त्या सर्वांची माहिती मागवण्यात आली होती. मात्र, अद्याप या लोकांची माहिती मिळालेली नाही. दरम्यान मुख्यमंत्री केजरीवाल यांनी सांगितले की, जर दिल्लीमध्ये एकाच वेळी 30 हजार कोरोना रुग्ण असले तरी त्याच्यासाठी सरकार तयार आहे.

केजरीवाल यांचा 5 टी प्लॅन …
दिल्लीत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केजरीवाल सरकारने 5 टी योजना तयार केली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले, पहिला टी म्हणजे टेस्टींग, दूसरा टी ट्रेसिंग, तीसरा टी ट्रीटमेंट, चौथा टी टीम वर्क आणि पाचवा टी ट्रॅकिंग आणि मॉनेटरिंग. त्यांनी सांगितले की कोरोनाला हरवण्यासाठी आपल्याला या प्लॅनवर काम करावे लागले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like