दिल्लीतील गुडिया गँगरेप केसचा आज निकाल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निर्भया प्रकरणानंतर चार महिन्यांनंतर झालेल्या गुडिया गँग रेप केसचा शनिवारी निकाल दिला जाणार आहे. निर्भया केसनंतर दिल्लीतील सर्वाधिक चर्चेत असलेल्या या सामुहिक बलात्कार केसमध्ये प्रदीप आणि मनोज या दोघांनी ५ वर्षाच्या गुडियावर अमानुष अत्याचार केला. त्यांच्यावर सामुहिक बलात्कार, अपहरण, पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न आणि पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. या खटल्यात एकूण ५९ साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या आहेत.

निर्भया प्रकरणानंतर चार महिन्यानंतर १५ एप्रिल २०१३ मध्ये ही घटना घडली होती. अतिशय निर्घुण पद्धतीने तिच्यावर अत्याचार करण्यात आला होता. तिच्या शरीरातून मेणबत्ती आणि काचेचा तुकडा शस्त्रक्रिया करुन काढण्यात आला होता. अनेक शस्त्रक्रिया केल्यानंतर तिचा जीव वाचविण्यात यश आले होते. पोलिसांनी दोघा आरोपींना बिहार आणि उत्तर प्रदेशातून अटक केली होती.

मनोज शहा आणि प्रदीप दोघेही या पिडित मुलीच्या शेजारी रहात होते. खटल्याच्या दरम्यान प्रदीप याच्या वडिलाने तो अल्पवयीन असल्याचा दावा केल्याने हा खटला रेंगाळला होता. निर्भया केसनंतर दिल्लीत हे प्रकरण खूप गाजले होते. लोकांनी मोठा प्रक्षोभ व्यक्त केला होता.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like