Delhi HC Grants Bail To Mumbai Ex CP Sanjay Pandey | फोन टॅपिंगप्रकरणी संजय पांडे यांना दिल्ली उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Delhi HC Grants Bail To Mumbai Ex CP Sanjay Pandey | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त (Mumbai Former CP) संजय पांडे (IPS Sanjay Pandey) यांना दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi High Court) नॅशनल स्टॉक एक्सचेंज (National Stock Exchange (NSE) कर्मचाऱ्यांच्या कथित बेकायदेशीर फोन टॅपिंगप्रकरणी (NSE Phone Tapping Case) जामीन मंजूर (Bail Granted) केला आहे. हा संजय पांडे यांच्यासाठी मोठा दिलासा मानला जात आहे. ईडीने (ED) त्यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अटक केली होती. संजय पांडे यांच्यावर मुंबई शेअर मार्केटमध्ये (Bombay Stock Market) कर्मचाऱ्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप आहे. (Delhi HC Grants Bail To Mumbai Ex CP Sanjay Pandey)

 

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीने 19 जुलै रोजी अटक केली होती. त्यांना न्यायालयीन कोठडीत (Judicial Custody) ठेवण्यात आले होते. ऑगस्टमध्ये ट्रायल कोर्टाने या प्रकरणात पांडे यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यावेळी न्यायालयाने निरीक्षण नोंदवताना म्हटले होते की, उपलब्ध सामग्रीवरून असे दिसून आले आहे की, ते एनएसईमधील कॉल रेकॉर्डिंग आणि मॉनिटरिंगच्या अंमलबजावणीमध्ये सहभागी होते आणि त्यांचा थेट कार्यालयीन कर्मचाऱ्यांशी संवाद होत होता.

नेमकं प्रकरण काय?
नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या सीईओ चित्रा रामकृष्णन (Chitra Ramakrishnan) यांना अटक करण्यात आली होती.
त्यांच्या संगनमताने फोन टॅपिंग केल्याचा पांडे याच्यावर आरोप आहे
चित्रा रामकृष्णन यांच्या सांगण्यावरून एनएसईच्या 91 लोकांचे फोन टॅप केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
संजय पांडे यांच्याशी संबंधित iSec Services Private Limited या कंपनीच्या माध्यमातून फोन टॅप करण्यात आले होते.
ही कंपनी 2001 मध्ये स्थापन करण्यात आली होती. त्यावेळी संजय पांडे पोलीस दलात नव्हते.
त्यांनी पोलीस दलाचा राजीनामा दिला होता. त्यांचा राजीनामा मंजूर झाला नाही आणि त्यांना पोलीस दलात परत बोलवण्यात आलं होतं.
संजय पांडे हे 1986 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी (IPS Officer) आहेत.

 

Web Title :- NSE Phone tapping Mumbai Ex CP Sanjay Pandey Gets Bail from delhi high court

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | वैद्यकीय विद्यार्थ्याला लुटल्यानंतर नग्न व्हिडिओ काढणाऱ्या 3 जणांना अटक

Karnataka Rakshana Vedike – Sanjay Raut | कन्नड रक्षण वेदिकेने दिली संजय राऊतांना जीवे मारण्याची धमकी, धमकीचे 2 फोन

Pimpri Chinchwad Bandh | महाराष्ट्रातील महापुरुषांच्या बदनामी विरोधात गुरुवारी पिंपरी-चिंचवड बंद, छत्रपती संभाजीराजे होणार सहभागी

Pune PMC News – Parvati Hill | ‘पर्वती हिलटॉप हिलस्लोपवरील जागा रहिवासी करून मूळ मालकाला देण्याच्या आदेशाची अंमलबजावणी नको’ – सर्वोच्च न्यायालय