पतांजलिच्या ‘कोरोनिल’वरुन न्यायालयाने बजावले समन्स; बाबा रामदेव यांच्या अडचणीत वाढ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पतांजलिच्या ‘कोरोनिल’ औषधासंदर्भात समाजात चुकीची माहिती पसरवल्या वरून योगगुरू बाबा रामदेव Baba Ramdev यांना दिल्ली उच्च न्यायालयाने समन्स बजावले आहेत. यावरून आता बाबा रामदेव Baba Ramdev यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसते.

Mucormycosis : तज्ज्ञांनी सांगितलं म्युकरमायकोसिस आजारामागील नेमकं कारण; जाणून घ्या

अ‌ॅलोपथी उपचारांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचं प्रकरण सध्या चर्चेत असताना आणखी एक पेच बाबा रामदेव समोर निर्माण झाला आहे. बाबा रामदेव विरोधात दिल्ली मेडिकल असोसिएशनकडून ‘पतांजलि’कडून ‘कोरोनिल’ बाबत चुकीची माहिती देण्यापासून रोखण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर बाबा रामदेव यांच्या वकिलांना न्यायालयाने आगामी सुनावणीपर्यंत ‘पतांजलि’नं ‘कोरोनिल’ बाबत सार्वजनिक पातळीवर कुठलंही वक्तव्य करू नये असं कोर्टाने म्हटलं आहे. याबाबत आगामी सुनावणी १३ जुलै रोजी होणार असल्याचं कोर्टाने स्पष्ट केलं आहे.

या दरम्यान, अ‌ॅलोपथी उपचारांना मूर्ख विज्ञान ठरवून वादग्रस्त विधान बाबा रामदेव यांनी केलं होत. यानंतर भारतातील डॉक्टरांनी बाबा रामदेव यांच्या वक्तव्याचा जोरदार निषेध व्यक्त केला. याबाबत इंडियन मेडिकल असोसिएशननं (IMA) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही पत्र लिहून बाब रामदेव यांनी केलेल्या विधानावरुन नाराजी व्यक्त केली होती. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनीही बाबा रामदेव यांना पत्र लिहून डॉक्टरांप्रती केलेले वक्तव्य मागे घेण्याच्या सूचना दिल्याने त्यांनी आपलं विधान मागे घेतलं होतं.

READ ALSO THIS :

Covid-19 Vaccine : कोविड व्हॅक्सीन घेतल्यानंतर ‘ही’ 7 कामं अजिबात करू नका, ‘या’ गोष्टींची घ्या काळजी; जाणून घ्या

मुंबईत प्रियकराच्या मदतीने केली पतीची हत्या, किचनमध्ये पुरलेल्या मृतदेहाचे रहस्य 6 वर्षाच्या मुलीने सांगितले

Photos : 133 किलो होते वजन, आयपीएस अधिकाऱ्यानं 9 महिन्यात कमी केलं 43 किलो वजन, वायरल झाली छायाचित्रे

तुषार कपूरने लग्न का केलं नाही?, म्हणाला…