×
Homeताज्या बातम्याDelhi High Court | 'लग्नानंतर शारीरिक संबंधांची अपेक्षा ठेवणं योग्य, अविवाहित जोडप्यांना...

Delhi High Court | ‘लग्नानंतर शारीरिक संबंधांची अपेक्षा ठेवणं योग्य, अविवाहित जोडप्यांना तो अधिकार नाही’ : दिल्ली उच्च न्यायालय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महिलांच्या लैंगिक स्वायत्ततेच्या (Women’s Sexual Autonomy) अधिकाराशी तडजोड केली जाऊ शकत नाही आणि बलात्काराच्या (Rape) कोणत्याही कृत्याला शिक्षा झालीच पाहिजे, असे दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi High Court) एका सुनावणी दरम्यान म्हटले आहे. त्याच वेळी, वैवाहिक (Marital) आणि विवाहबाह्य संबंधांमध्ये (Extramarital Affairs) ‘गुणात्मक फरक’ आहे. कारण वैवाहिक नातेसंबंध जोडीदाराकडून योग्य लैंगिक संबंधाची अपेक्षा करण्याचा कायदेशीर अधिकार (Legal Rights) सूचित करते आणि फौजदारी कायद्यातील (criminal Law) वैवाहिक बलात्काराच्या गुन्ह्यातून मुक्त असल्याचे दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi High Court) म्हटले.

 

वैवाहिक जीवनात गुणात्मक फरक (Qualitative differences in marital life)
बलात्काराचे गुन्हेगारीकरण करण्याच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती सी. हरिशंकर (Justice C. Hari Shankar) म्हणाले की, विवाहबाह्य संबंध आणि वैवाहिक संबंध ‘समांतर’ असू शकत नाहीत. न्यायमूर्ती सी. हरिशंकर हे न्यायमूर्ती राजीव शकधर (Justice Rajiv Shakadhar) यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाचा भाग होते. ते म्हणाले की, मुलगा आणि मुलगी कितीही जवळचे असले तरी शारीरिक संबंधाची अपेक्षा ठेवण्याचा अधिकार कोणालाही नाही. मला तुझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा नाही, हे सांगण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. वैवाहिक जीवनात गुणात्मक फरक आहे. (Delhi High Court)

 

पती पत्नीवर जबरदस्ती करु शकत नाही (Husband cannot force wife)
न्यायमूर्ती हरिशंकर यांनी बलात्काराचा गुन्हा दंडनीय असून त्यासाठी 10 वर्षांची शिक्षा आहे,
याचाही सुनावणी दरम्यान आवर्जुन उल्लेख केला.
वैवाहिक बलात्काराची (Marital Rape) सूट काढून टाकण्याच्या मुद्यावर ‘गांभीर्याने विचार’ करण्याची गरज असल्याचे हरिशंकर यांनी म्हटले आहे.
तसेच स्त्रीच्या लैंगिक आणि शारीरिक अखंडतेच्या अधिकाराशी कोणतीही तडजोड नाही.
पती पत्नीवर जबरदस्ती करु शकत नाही.
(मात्र) ते रद्द केल्याने काय परिणाम होईल, याकडे दुर्लक्ष करु शकत नाही (वैवाहिक बलात्कार अपवाद), असेही ते म्हणाले.

‘वैवाहिक बलात्कार’ शब्दावर आक्षेप (Objection to the word marital rape)
न्यायमूर्ती सी हरिशंकर यांनी ‘वैवाहिक बलात्कार’ शब्दाच्या वापरावरही आक्षेप व्यक्त करत बलात्काराच्या प्रत्येक कृतीला शिक्षा झालीच पाहिजे, असे म्हटले.
मात्र पती-पत्नीमधील इच्छा व्यतिरिक्त ठेवलेल्या शारीरिक संबंधाच्या कोणत्याही स्वरुपाची वैवाहिक बलात्कार अशी पुनरावृत्ती केलेली व्याख्या पूर्णनिर्णय असे म्हणता येईल.

 

भारतात वैवाहिक बलात्काराची संकल्पना नाही (There is no concept of marital rape in India)
भारतात वैवाहिक बलात्काराची संकल्पना नाही.
जर तो बलात्कार असेल मग तो वैवाहिक, विवाहबाह्य अथवा इतर कोणत्याही प्रकारचा बलात्कार असेल, तर त्याला शिक्षा झालीच पाहिजे.
माझ्या मते, हा शब्द वारंवार वापरल्यानं खरा प्रश्न गुंतागुंतीचा होतोय, असेही ते म्हणाले.

 

दरम्यान, आरआयटी फाउंडेशन (RIT Foundation) आणि ऑल इंडिया डेमोक्रॅटिक वुमेन्स असोसिएशन (All India Democratic Women’s Association) या एनजीओच्या याचिकांवर सुनावणी दरम्यान, न्यायमूर्ती सी. हरिशंकर यांनी बलात्कार आणि वैवाहिक नातेसंबंधातील फरक स्पष्ट केला. या संघटनांच्या वतीने अधिवक्ता करुणा नंदी (Advocate Karuna Nandi) यांनी काम पाहिले.

 

Web Title :- Delhi High Court | any act of rape punishable but marital relationship is qualitatively different from delhi high court

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

PM Gareeb Kalyan Yojana | पंतप्रधान गरीब कल्याण योजना 2022 : PMGKY च्या नवीन अपडेट विषयी जाणून घ्या सविस्तर

 

Corona New Cases In India | कोरोना केसमध्ये 6.4% घट ! गेल्या 24 तासात कोविड-19 च्या 1 लाख 68 हजार नवीन केस, 277 जणांचा मृत्यू

 

Pune Navale Bridge Accident | पुण्यातील नवले पुलाजवळ लागोपाठ दुसर्‍या दिवशी अपघात; बोअरवेल ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ‘विजय कुलकर्णी’ जागीच ठार

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News