…अन्यथा ‘छपाक’ चित्रपटगृहात दिसणार नाही, निर्मात्यांना हायकोर्टाचे आदेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोण स्टार ‘छपाक’ प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. छपाकचे प्रदर्शन थांबवण्यासाठी काही दिवसांपूर्वीच दिल्ली पटियाल हाऊस कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. लक्ष्मीच्या वकील अपर्णा भट यांनी ही याचिका दाखल केली आहे. यानंतर छपाकच्या निर्मात्यांना दिल्ली हायकोर्टात आदेश दिले आहे. पीडितेच्या वकील अपर्णा भट यांना कथेचे श्रेय द्यावे, असे हायकोर्टाने म्हटले आहे.

https://www.instagram.com/p/B6xityTDhEq/

जर या चित्रपटाचे श्रेय अपर्णा भट यांना दिले नाही तर 15 जानेवारीनंतर ‘छपाक’ चित्रपटगृहात दाखविला जाणार नाही, असे हायकोर्टाने म्हटले आहे. चित्रपटावर अपर्णा भट नाराज असल्याचे दिसत आहे. त्यांच्या नावाचे उल्लेख या चित्रपटात दिला गेला नाही आणि क्रेडिटदेखील दिल्याचे दिसत नाही. यामुळे चित्रपटाचे प्रदर्शन थांबविण्यासाठी त्यांनी याचिका दाखल केली आहे. यांच्या याचिकेवर शनिवार 11 जानेवारीला कोर्टात सुनावणी झाली. अपर्णा यांनी चित्रपटाची दिग्दर्शिका मेघना गुलजार, निर्माती दीपिका पादुकोण यांच्याविरोधात याचिका दाखल केली होती. अपर्णा यांनी लक्ष्मीची केस 10 वर्ष लढली होती आणि जिंकलीसुद्धा होती. यासाठी त्यांनी कोणतेच मानधन घेतले नव्हते.

‘अ‍ॅसिड हल्ला पीडित लक्ष्मी अग्रवालची केस अनेक वर्षे लढली मात्र या चित्रपटात मला कुठेच क्रेडिट दिले गेले नाही’ असे याचिकेत अपर्णा यांनी म्हटले होते. त्याचबरोबर त्यांनी चित्रपटाच्या स्क्रिप्टसाठी सुद्धा मदत केली होती. त्यांना निर्मात्यांनी चित्रपटात क्रेडिट देण्याचा विश्वासही दिला होता. मात्र प्रत्यक्षात असे काही झाले नाही. त्यामुळे जोपर्यंत क्रेडिट लिस्टमध्ये त्यांचे नाव सामिल होत नाही तोपर्यंत चित्रपट प्रदर्शित होऊ देऊ नका, अशी मागणी अपर्णा यांनी केली आहे. जेएनयूतील हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलनामध्ये दीपिकाने सहभाग घेतला होता. यावरून तिचा चित्रपट ‘छपाक’वर बहिष्कार घालण्याची मोहीम ट्रोलर्सनी राबविली आहे.

https://www.instagram.com/p/B6H71YfghC-/

 

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/