….म्हणून उच्च न्यायालयानेच आयोजित केला कबड्डीचा सामना

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

दिल्लीच्या इंदिरा गांधी स्टेडियममध्ये आज न्यायालयाच्या निरीक्षणाखाली कबड्डीचा सामना खेळला जाणार आहे. यामध्ये १८ व्या आशियाई क्रिडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केलेल्यांच्या संघाविरुद्ध या स्पर्धेसाठी निवड न झालेल्या खेळाडूंच्या संघांचा समावेश आहे.

भारताचे माजी कबड्डीपट्टू महिपाल सिंग यांनी दाखल केलेल्या याचिकेवर निर्णय घेण्यासाठी न्यायालयाने या सामन्याचे आयोजन करावे असे आदेश दिले होते. महीपाल सिंग यांनी अमॅच्युअर कबड्डी महासंघावर लाच घेऊन खेळाडूंची निवड केल्याचा आरोप केला होता. या आरोपाची सत्यता आणि खेळाडूंची निवड कशी झाली आहे हे पडताळून पाहण्यासाठी न्यायालयाने हा मार्ग अवलंबला आहे.अनोख्या अशा सामन्याचे आयोजन करण्याचा निर्णय उच्च न्यायलयाने गेल्या महिन्यात दिला होता.

याबाबत दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमर्ति राजेंद्र मेनन आणि न्यायमूर्ति वीके राव यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने म्हटले होते की, आशियाई क्रीडा स्पर्धा झाल्यावर संघ भारतात परतले की भारतीय संघांचा सामना त्या खेळाडूंच्या संघाशी होईल ज्यांना राष्ट्रीय संघात स्थान मिळाले नाही. तसेच न्यायालयाने आपलेल्या आदेशामध्ये म्हटले होते. की १५ सप्टेंबर २०१८ला या सामन्याचे आयोजन करण्यात येईल.

[amazon_link asins=’B074GY4DSL,B07CRGDR8L’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’85749e0a-b8af-11e8-98c5-6b6057d2a511′]
कबड्डीच्या या सामन्यावेळी माजी न्यायमूर्ति गर्ग उपस्थित राहणार आहेत. मात्र, या सामन्याबाबत याचिकाकर्त्यांच्या वकीलांनी सांगितले की, या सामन्यात खेळायचे की नाही हे ठरवण्याची मुभा आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी निवड झालेल्या संघातील खेळाडूंना आहे. यामुळे ते प्रतिष्ठा जपण्यासाठी किंवा सामना टाळण्यासाठी अनेक कारणे देवू शकतात. त्यात खेळाडूंचा दोष नाही. त्यांना भिती आहे की निवड न झालेले खेळाडू हरवतील.

न्यायालयाच्या नजरेखाली होणाऱ्या या सामन्याचे रेकॉर्डिंगही होणार असून साक्ष आणि पुरावा म्हणून न्यायालयात सादर केले जाणार आहे. याच्या आधारावरच न्यायालय निर्णय देणार आहे.

भारताच्याच नव्हे तर कदाचित जगाच्या इतिहासात पहिल्यांदाच न्यायालयाच्या निरीक्षणाखाली कबड्डीचा सामना खेळला जाणार आहे.