दिल्‍ली उच्च न्यायालयाकडून तब्बल 60 वेबसाइटवर ‘वर्ल्ड कप मॅच’ दाखविण्यास बंदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणूकांच्या चर्चा झाल्यानंतर आता वर्ल्ड कपचे वारे वाहत असताना, कोट्यावधी लोक घरातून, ऑफिसमधून, प्रवास करताना मोबाईल, लॅपटॉपवर क्रिकेट पाहत आहेत, मात्र आता यावर बंधन येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण या क्रिकेटच्या फिवरमध्येच दिल्ली उच्च न्यायालयाने क्रिकेटचे प्रसारण होणाऱ्या ६० बेवसाइटवर आणि काही रेडिओ स्टेशनवर मॅचचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यास बंधने घातली आहेत. यामुळे क्रिकेट चाहत्यावर नाराजी ओढवणार आहे.

न्यायाधीश जे आर मिधा यांनी चॅनल ग्रुपच्या कॉर्पोरेशनच्या याचिकेवर हा निर्णय दिला आहे. ज्यात ३० मे पासून १४ जुलै या काळात आयोजित वर्ल्ड कप मध्ये ऑडिओ कवरेजचा कॉपीराइटचा दावा करण्यात आला आहे. न्यायालयाने वेबसाइट, रेडिओ चॅनेल यांना नोटीस जारी केली आहे. या सगळ्यांना ४ सप्टेंबर पर्यत आपली उत्तर देण्याचा आदेश देण्यात आला आहे. या प्रकरणी आता ४ सप्टेंबरला सुनावणी होणार आहे.

न्यायालयाने मागील काही दिवसांपुर्वी गुगल सारख्या सर्च इंजिन्सला तसेच एअरटेल आणि वोडाफोन सारख्या इंटरनेट, दूरसंचार सेवा देणाऱ्यांना उल्लंघन करणाऱ्या वेबसाइटची लिंक हटवण्याचे किंवा त्याला बंद करण्याचे निर्देश दिले होते जेथे वर्ल्ड कपच्या ऑडिओ कवरेज अनाधिकृतपणे लोकांना उपलब्ध करुन देण्यात येते.

न्यायालयाचे म्हणणे होते की, या प्रकरणातील तथ्य आणि परिस्थिती पहता याचिकाकर्ता ‘चॅनल २ ग्रुप’ च्या बाजूने एक पक्षीय आदेश जारी करणे आवश्यक होते. याचिकाकर्तांनी वल्डकप२०१९ चे आयोजक आयसीसी बिजनेस कॉर्पोरेशनच्या सोबत ऑडिओ अधिकारासंबंधित करार केला होता.

आरोग्यविषयक वृत्त –

गरोदरपणा नंतरचा लठ्ठपणा नको ? मग ‘हे’ पाणी प्या

डिप्रेशनवर उपचार करा घरच्या घरी ; ‘ह्या’ सात सोप्या पद्धती

लठ्ठपणामुळे होऊ शकतात ‘हे’ १० गंभीर आजार

गरोदरपणातील समज-गैरसमज ? जाणून ‘घ्या’ सत्य