दिल्ली गारठली ! धुक्याचा ‘कहर’, 68 जणांचा मृत्यू तर 8 राज्यांमध्ये ‘रेड अलर्ट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर भारतात थंडीचा कहर पहायला मिळतोय. दिल्लीसह इतर अन्य ठिकाणी तापमान शून्यासह तीन डिग्री पर्यंत गेल्याचे पहायला मिळाले. धुक्यांमुळे अनेक ठिकाणी शून्य दृश्य परिस्थिती निर्माण झाली. म्हणजे दिवस असून देखील समोरील चित्र दिसत नव्हते. हवामान खात्याने रविवारी आठ राज्यांमध्ये रेड अलर्ट घोषित केला आहे. पंजाब, हरियाणा, चंडीगढ, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान आणि मध्यप्रदेशामध्ये कडाक्याची थंडी पडल्याने इशारा देण्यात आला आहे. त्यातच उत्तरप्रदेशात थंडीमुळे 68 लोकांचा मृत्यू झाला आहे.

दाट धुक्यामुळे उत्तरेकडची तीस रेल्वे गाड्या संथ गतीने सुरु आहेत. धुक्याचे सावट विमानांवर देखी मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. एकही फ्लाईट अद्याप रद्द करण्यात आलेली नाही मात्र धुक्यामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आलेल्या आहेत.

दाट धुक्यामुळे विमानांना टेक ऑफ आणि लँडींगसाठी अडचण निर्माण होत आहे तसेच अनेक प्रवाश्याना यामुळे मोठ्या गैरसोयीचा सामोरे जावे लागत आहे. दोन जानेवारीच्या दरम्यान यूपी, पंजाब, हरियाणा, चंडीगढ आणि दिल्ली समवेत उत्तर – पश्चिम भारतात पाऊस पडू शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे.

दिल्लीमध्ये अनेक वर्षानंतर वाढला एवढा गारठा
दिल्लीत सतत सोळा दिवस थंडी कायम राहिली. यापूर्वी डिसेंबर 1997 मध्ये दिल्लीत सलग 13 दिवस शीतलहरी होत्या. तसेच, 1901 मध्ये झालेल्या हिवाळ्यामुळे डिसेंबरमध्ये खूप अडचण निर्माण झाली होती. नवीन वर्षात 1 ते 3 जानेवारी दरम्यान हलका पाऊस आणि 2 जानेवारीला गारपीट अपेक्षित आहे.

रविवारी हवेची दिशा बदलली तर तापमानात वाढ झाल्याचे दिसून आले होते. लोदी रोडवर कमी तापमान 2.8,पालममध्ये 3.2, सफदरजंगमध्ये 3.6, आणि आया नगरमध्ये 2.5 डिग्री सेल्सियस तापमान पहायला मिळाले.

सोमवारी सकाळीही थंडी व दाट धुके पहायला मिळाले. पश्चिम अस्थिरतेमुळे 31 डिसेंबर रोजी वाऱ्याचा वेग वाढेल. नवीन वर्षामध्ये 1 ते 3 जानेवारी दरम्यान रात्री हलका पाऊस पडेल. 2 जानेवारीला दिल्ली-एनसीआरमध्ये गारपीट होऊ शकते. धुक्याचा परिणाम काही दिवस कायम राहण्याची अपेक्षा आहे.

विमान आणि रेल्वेवर खराब हवामानाचा परिणाम
दिल्ली विमानतळावर खराब हवामानामुळे एअरक्राफ्ट्स आणि ट्रेनच्या अवागमनावर परिणाम होत आहे. अशा परिस्थितीत केवळ कॅट 3 बी प्रणालीचे प्रशिक्षित वैमानिक हे विमान उतरण्यास सक्षम आहेत.प्रवाश्याना आपल्या विमानाबाबत माहिती करून घेण्यासाठी एयरलाइनला संपर्क करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/