मुस्लिमांनी घाबरु नये, नागरिकत्व कायद्याचा आपल्याशी संबंध नाही : शाही इमाम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सुधारित नागरिकत्व कायद्याचा भारतात वास्व्यास असणाऱ्या मुस्लिमांशी काहीही संबंध नाही, असे वक्तव्य दिल्लीमधील जामा मस्जिदचे शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांनी केले आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रीय नागरिक नोंदणीवरून (एनआरसी) सुरू असलेल्या आंदोलनावर बोलताना अद्याप तो कायदा झाला नसल्याची आठवण करून दिली.

निषेध करणे हा भारतीय नागरिकांचा हक्क आहे. त्यासाठी कोणीही थांबवू शकत नाही. पण निषेध करताना नियंत्रण ठेवणेही गरजेचे आहे. आपल्या भावना नियंत्रणात ठेवणे हा त्यातील अत्यंत महत्त्वाचा भाग असल्याचे शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांनी म्हटलं आहे. तसेच राष्ट्रीय नागरिक नोंदणी आणि नागरिकत्व कायद्यात फरक आहे. नागरिकत्व विधेयकाचं कायद्यात रुपांतर झालं असून राष्ट्रीय नागरिक नोंदणीची फक्त घोषणा झाली आहे. तो अद्याप कायदा झालेला नाही, असेही शाही इमाम यांनी सांगितले.

नागरिकत्व कायद्यांतर्गत पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशमधून भारतात आलेल्या मुस्लिमांना नागरिकत्व मिळणार नाही. याचा भारतात वास्तव्यास असणाऱ्या मुस्लिमांशी काही संबंध नसल्याचे शाही इमाम यांनी सांगितले आहे. दुसरीकडे माजी अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांचेही वक्तव्य आले आहे. त्यांनी नागरिकत्व कायद्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत जे आधीपासून पाकिस्तानचे नागरिक आहेत त्यांना नागरिकत्व का द्यायचं ? असा प्रश्न विचारला आहे.

फेसबुक पेज लाईक करा –  https://www.facebook.com/policenama/