फक्त 1600 रुपयात वैष्णव देवीला पोहचणार ‘वंदे भारत’ एक्सप्रेस, PM मोदींनी दिली नवरात्रीची भेट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नवरात्रीच्या मुहूर्तावर सरकारने वैष्णोदेवीच्या भक्तांना एक भेट दिली आहे. गुरुवारी केंदीय गृह मंत्री अमित शहा यांनी दिल्ली वरून कटरा जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा कंदील दाखवला आहे. यामुळे आता वैष्णव देवीसाठी दिल्ली ते कटरा प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार आहे.

याबाबत माहिती देणारे एक ट्विट नरेंद्र मोदी यांनी केले आहे ज्यामध्ये ते म्हणतात, नवरात्रीनिमित्त जम्मूच्या लोकांसाठी विशेष भेट आहे. अत्याधुनिक सुविधा असलेल्या ‘वंदे भारत एक्सप्रेस’ने भक्त आता केवळ आठ तासात दिल्ली ते कटरा हा प्रवास करणार आहेत. यामुळे जम्मू काश्मीरच्या पर्यटनाला चालना मिळणार असून भक्तांचा प्रवास देखील सुखकर होणार आहे. जय माता दी !

तसेच या प्रवासाचे फायदे सांगत मोदींनी या प्रवासासाठी कमीत कमी 1630 रुपये आणि जास्तीत जास्त 3014 रुपये खर्च येणार असल्याचे सांगितले आहे.

मोदींनी सांगितली वंदे भारत एक्सप्रेसची वैशिष्ट्ये –

– देशातील दुसरी वंदे भारत एक्सप्रेस
– CCTV सुविधा उपलब्ध
– जीपीएसची सुविधा
– वाय फायची सुविधा
– मेक इन इंडिया अंतर्गत स्वदेशी निर्मिती

ही रेल्वे आठवड्यातून सहा दिवस चालणार आहे. ही ट्रेन दिल्लीतून सकाळी 6 वाजता निघेल आणि कटरा येथे दुपारी 2 वाजता पोहचेल. त्यानंतर दुपारी पुन्हा 3 वाजता कटरा येथून निघणार आहे आणि रात्री 11 वाजता दिल्लीला पोहचणार आहे.

काय आहेत ट्रेनची वैशिष्ट्ये –
या ट्रेनमध्ये 16 डब्बे आहेत ज्यामध्ये 14 चेयर कार आणि 2 एग्जीक्यूटिव्ह क्लास दिलेले आहेत. 1100 प्रवाशांना एकाचवेळी या ट्रेनद्वारे प्रवास करता येणार आहे. बुकिंग सुरु करण्यात आलेली आहे.

Visit : Policenama.com