‘क्रुर’ घटनेमुळे राजधानी दिल्‍ली ‘हादरली’ ! शिक्षकाकडून पत्नी, 3 मुलांचा गळा दाबवून खून

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीत एक भयंकर प्रकार घडला. दिल्लीतील महरौली भागातील एका व्यक्ती ने आपल्या 3 मुलांसह पत्नीची हत्या केली. पत्नीची धारधार चाकूने हत्या केल्यावर या व्यक्तीने लहान मुलाची गळा दाबून त्यांची हत्या केली, आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे आणि पोलिसांनी हत्येचा तपास सुरु केला आहे. आरोपीने एक चिट्टी देखील लिहून ठेवली आहे. ज्यात त्याने मान्य केले आहे की त्याने 4 जणांची हत्या केली. हा आरोपी शिक्षक असून मुलांचे क्लासेस देखील घेत असत.

अजून याची पुष्टी झालेले नाही की त्यांने हे भंयकर पाऊल का उचलले. या व्यक्तीला दोन मुली आणि एक मुलगा होता. मुलीचे वय 7 वर्ष आणि मुलीचे 5 वर्ष आहे तर सर्वात लहान मुलीचे वय फक्त अडीच वर्ष आहे. आरोपीची नाव उपेंद्र शुक्ला आहे, आणि त्यांनी शुक्रवारी रात्री 1 ते 1.30 च्या दरम्यान या हत्या केल्या आहेत.

मृत झालेल्या व्यक्तीमध्ये एक मुलगा, दोन मुली आणि पत्नीचा समावेश आहे. ज्या घरात उपेंद्रने या सर्वांची हत्या केली त्याच घरात त्याची सासू देखील राहत असे. उपेंद्र दरवाजा उघडत नाही असे लक्षात आल्यावर तिने आजूबाजूच्या लोकांना बोलावून घेतले. शेजारच्यांनी पोलिसांना याची माहिती दिली, पोलिसांनी घटनास्थळी पोहचून आरोपीला ताब्यात घेतले. आता त्याची चौकशी केली जात आहे.

आरोग्य विषयक वृत्त –

मुतखड्याच्या असह्य वेदना टाळण्यासाठी घ्या ‘ही’ काळजी

रोग प्रतिकारशक्ती दुबळी का होते ? जाणून घ्या

लहान मुलांनाही शिकवा हि “योगासन” होतील फायदे  

लहान मुलांची उंची वाढण्यासठी करा हे नैसर्गिक उपाय